जळगाव : महापालिका, नगरपालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांसाठी आनंददायी निर्णय शासनाने घेतली आहे. लाड पागे समितीच्या शिफारशींनुसार वारसा हक्काने नियुक्तीसाठी लहान कुटुंबाची अट वगळण्यात आली आहे. तसेच पात्र वारसात विवाहीत मुलींचाही यात समावेश करण्यात आला आहे. शासनाचे अवर सचिव सतीश खैरमोडे यांनी ११ मार्च रोजी याबाबत आदेश काढले आहेत. त्यानुसार वारसा हक्कास पात्र ठरणारे सफाई कामगारांचे वारस व सफाई कामगारांच्या वारसा हक्काबाबत असलेल्या तरतुदीनुसार सुधारणा करण्यात आलेल्या आहेत.
यात पात्र ठरणारे सफाई कामगारांचे वारस या सदरात सफाई कर्मचाऱ्यांच्या विवाहीत मुलीचाही समावेश करण्यात येत आहे. तर वारसा हक्कांबाबत लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र देण्याची अतिरिक्त अट नियुक्ती देण्यापूर्वी जातवैधता प्रमाणपत्र प्राप्त करून घेण्याची अट वगळण्यात आली आहे.
तूर्तास दोघांना होणार फायदा याबाबत महापालिकेतर्फे दोन प्रकरणे शासनाकडे मंजुरीसाठी
पाठविले होते. त्यांना या शासनादेशानुसार फायदा होणार आहे. यासोबतच जुने व नवीन अशा दोन्ही कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा फायदा होणार आहे. याबाबत आयुक्तामार्फत पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे.
– अविनाश गांगोडे, उपायुक्त आरोग्य, महापालिका जळगाव