Jalgaon News : समाजात बदमानी करण्याची धमकी देत महिलेच्यावर अत्याचार, गुन्हा दाखल

crime news :  तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या २८ वर्षीय महिलेशी ओळख निर्माण करून गेल्या वर्षभरापासून तिच्यावर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आली आहे. या १८ मे ला सांयकाळी ७ वाजता अडावद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे.राकेश सुभाष सोनवणे असे तरुणाचे नाव आहे.

मिळलेल्या माहितीनुसार चोपडा तालुक्यातील एका गावात २८ वर्षीय महिला आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. राकेश सोनवणे याने महिलेशी ओळख निर्माण करत त्याने गेल्या वर्षभरापासून तिच्यावर जबरी अत्याचार केला. तसेच महिलेच्या वाढदिवशी रात्री १२ वाजता केक घेवून तो महिलेच्या घरी गेला.

तिच्या घरात केक कापून तिच्यासोबत गप्पा मारल्या त्यानंतर पुन्हा तिच्या ईच्छेविरूध्द तिच्यावर अत्याचार केला. तसेच समाजात तुझी बदनामी करेल अशी धमकीही दिली. हा प्रकार सहन न झाल्याने महिलेने अडावद पोलीसात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अडावद पोलीस ठाण्यात संशयित आरोपी राकेश सुभाष सोनवणे वय-२२ रा. चोपडा याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजू थोरात हे करीत आहे.