जळगाव : शहरातील सार्वजनिक ठीकाणी धुम्रपान करणे या कायद्यांतर्गत जिल्हा आरोग्य विभागाच्या पथकाने आज शहरातील 27 जणांवर गुन्हे दाखल करत 5 हजार 100 रुपयांचा दंड वसूल केला.
जळगाव शहरात तंबाखू व अन्य तंबाखूजन्य उत्पादने कायदा – 2003 (COTPA2003) या कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. हि मोहीम रेल्वे स्टेशन परिसरात करण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण अंतर्गत जिल्हास्तरीय अंमलबजावणी पथक स्थापित करण्यात आले आहे. या पथकाचे सदस्य सचिव जिल्हा शल्य चिकित्सक किरण पाटील आहेत. या भरारी पथकात दंत शल्य चिकित्सक डॉ. संपदा गोस्वामी, पोलीस विभागामार्फत श्री. प्रदीप सिरसाळ पाटील व श्री. शिदे, जिल्हा आरोग्य अधिकारी जि.प. यांचे प्रतिनिधी कु. निशा कटरे सायकॉलॉजीस्ट, आरोग्य अधिकारी म.न.पा. यांचे प्रतिनिधी डॉ. विकास पाटील, अन्न सुरक्षा अधिकारी, शरद पवार, विभागीय व्यवस्थापक अनिल गुंजे यांचा समावेश होता.