भुसावळ : सीमी प्रकरणात दाखल असलेल्या गुन्ह्यात २२ वर्षांपासून फरार असलेल्या भुसावळातील न.पा. उर्दू शाळेतील शिक्षक हनीफ शेख मोहम्मद हनीफ (भुसावळ) यांना न्यू दिल्लीतील विशेष सेलच्या पोलिसांनी गुरुवार, २२ फेब्रुवारी रोजी दुपारी अटक केली होती. पोलीस कोठडीत ४८ तासांपेक्षा अधिक काळ राहित्याने हनीफ शेख यांना निलंबित करण्याबाबत भुसावळ नगरपालिका शाळेच्या प्रशासन अधिकाऱ्यांनी मुख्याधिकाऱ्यांकडे अहवाल दिला होता.
या अहवालाअंती मुख्याधिकारी महेश वाघमोडे यांनी सोमवारी सायंकाळी शिक्षकाला निलंबित करण्याचे आदेश काढल्याने खळबळ उडाली आहे. अटकेनंतर सुनावली होती कोठडी दिल्लीतील न्यू फ्रंट कॉलनी पोलीस ठाण्यात संशयित हनीफ शेख मोहम्मद हनीफविरोधात २००१ मध्ये त्यावेळच्या सीमी प्रकरणात गुन्हा दाखल आहे. संशयिताने २००१ मध्ये प्रतिबंधित दहशतवादी संघटना ‘सिमी’चे निघणारे मासिक ‘इस्लामिक मुव्हमेंट’ मध्ये प्रक्षोभक लिखाण केल्याच्या आरोपान्वये हा गुन्हा दाखल आहे मात्र २२ वर्ष या गुन्ह्यात संशयित हजर न झात्याने न्यायालयाने त्यास फरार घोषित केले व त्यानंतर गुरुवार, २२ फेब्रुवारी दिल्लीतील विशेष सेलच्या पोलिसांनी संशयिताला भुसावळात येवून अटक केली.
स्थानिक न्यायालयातून ४८ तासांचा ट्रान्झीट रीमांड घेतल्यानंतर संशयिताला पटियाला हाऊस न्यायालयात हजर केल्यानंतर १५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. अहवाल येताच शिक्षकाचे निलंबन भुसावळातील शिक्षकाला न.पा. शाळेतील अटक झाल्यानंतर नगरपालिका शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिका-यांनी उर्दू शाळा क्रमांक १९ च्या मुख्याध्यापकांना पत्राद्वारे विचारणा करीत अह्वाल मागितला व अहवाल येताच त्याबाबत टिपणी करून मुख्याधिकाऱ्यांना अहवाल सादर करण्यात आला. मुख्याधिकारी महेश वाघमोडे यांनी प्रकरणाचे गांभीर्य पाहता संबंधित शिक्षकाला तातडीने निलंबीत करण्याबाबत आदेश सोमवार, ४ मार्च रोजी सायंकाळी काढल्यानंतर शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली