जळगाव : बाहेर जावून येतो, असे झोपेतील पत्नीला बोलत पती घराबाहेर पडले. त्यानंतर घराच्या छतावर जावून गळफास घेत आत्महत्या केली. रविवार, ३१ रोजी पहाटे ही घटना शहरात सुप्रिम कॉलनीत उघडकीस आली. अरुण मधुकर पाटील असे मृताचे नाव आहे. अरुण पाटील हे त्यांच्या पत्नी, मुलगा, मुलगीसह शहरात सुप्रिम कॉलनीत वास्तव्यास होते.
उदरनिर्वाह करण्यासाठी ते एमआयडीसीतील एका कंपनीत कार्यरत होते. कुटुंबातील सर्व सदस्य झोपले होते. रविवार, ३१ च्या मध्यरात्री बाहेर जावून येतो, असा आवाज पत्नीला देत अरुण पाटील घराबाहेर पडले. त्यांनतर बाहेरुन कडी लावून त्यांनी घराचा दरवाजा बंद केला. जिनाच्या पायऱ्या चढून ते छतावर गेले. पडदीला दोरी बांधली. याच दोरीने गळ्याला फास लावून त्यांनी आत्महत्या घेत टोकाचा निर्णय घेतला.
ही घटना पहाटे उघडकीस आली. कुटुंबियांना या घटनेने जबर मानसिक धक्का बसला. स्थानिक नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी बेशुध्दावस्थेतील अरुण पाटील यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविले. तपासणी अंती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत त्यांना घोषित केले. मयताच्या पश्चात पत्नी निता, मुलगा आदित्य (वय १६), मुलगी साक्षी (वय १८) असा परिवार आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली