जळगाव : सुरक्षा रक्षकाने काम सोडले म्हणून कंपनी मालकाने सुरक्षा रक्षकाला शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलीस सूत्रानुसार, मनोज झिपरू तडवी (४२) रा. पांडे चौक, तुकाराम वाडी, जळगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. ते एमआयडीसील मधील भास्कर मसाले कंपनीत सेक्यूरीटी म्हणून नोकरीला होते. त्यांनी ते काम काही दिवसांपुर्वीच सोडले होते.
दरम्यान, मनोज तडवी हे ६ ऑगस्ट रोजी सकाळी ८.३० वाजता एमआयडीसीतील गोपल दालमिल चौकातून जात असताना भास्कर मसाले कंपनीचे मालक भुषण मराठे रा. रामेश्वर कॉलनी, जळगाव याने सुरक्षा रक्षकाचे काम सोडल्याच्या रागातून त्यांना चापटाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. तसेच “तु जर मला पुन्हा दिसला तर तुला पुन्हा मारेल” अशी धमकी दिली.
या प्रकरणी तडवी यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार भास्कर मसाले कंपनी मालक भुषण मराठे याच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ विजय पाटील करीत आहे.