jalgaon news: सोलर सिस्टिमसाठी गोलाणी मार्केटच्या छताची पाहणी

जळगाव : महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीजवळच असलेल्या गोलाणी मार्केटच्या छतावर सोलर सिस्टीम लावण्यात येणार आहे. यासाठी महाऊर्जेच्या अधिकाऱ्यांनी छताची पाहणी केली आहे. कोणत्या जागेवर किती व्हॅटचे सोल पॅनल बसवयाचे याचा डीपीआर (आराखडा) लवकरच महापालिकेला महाउर्जाकडून सादर करण्यात येणार आहे.

महाऊर्जाच्या प्रतिनिधींकडून गोलाणी मार्केटच्या छताची व मनपा प्रशासकीय इमारतीची पाहणी करण्यात आली. प्रशासकीय इमारतीच्या वीज बिलावर होणाऱ्या खर्चाची व वीज बिलाची माहिती त्यांनी घेतली. छतावरील वापरण्यासाठी जागा, पाण्याच्या टाक्या, जिन्याची जागा आदीची पाहणी केली. मनपा प्रशासकीय इमारतीच्या मीटर रूमची पाहणी करून केबल कशी टाकता येईल याची देखील त्यांनी माहिती घेतली.प्रशासकांचा ड्रिम प्रोजेक्टगोलाणी मार्केटच्या छतावर सौर ऊर्जा निर्मिती करणे हा प्रशासक तथा आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांचा ड्रिम प्रोजेक्ट आहे. सहाय्यक आयुक्त गणेश चाटे, लाईट विभाग प्रमुख एस.एस.पाटील हे काम पाहत आहेत.

आराखडा तयार झाल्यानंतर होईल सुरवात

महाऊर्जातर्फे पाहणी केल्यानंतर त्याचा सविस्तर आराखडा तयार होणार आहे. यात किती सोलर पॅनल बसवायचे, त्यातून किती वीज निर्मिती होईल, त्यातील किती वीज मनपा वापरणार व किती वीज ही महाऊर्जेला मिळणार, या सर्व प्रक्रियेचा खर्च किती येणार याबाबीचा या आरखड्यात समावेश असणार आहे.