जळगाव: घर ते शाळा व शाळा ते घर हा तासा दीड तासाचा शालेय विद्यार्थ्यांचा स्कूल व्हॅनमधील प्रवास अधिक मजेदार करण्याचा प्रयत्न होत आहे. स्कूल व्हॅनमध्ये पाढे आणि शैक्ष्ाणिक बालगीतांचे ऑडीओ ऐकवण्याची सुविधा करण्याचा प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या उपशिक्ष्ाणाधिकारी पी. एस.सानप यांनी स्कूल बस सुरक्ष्ाितता समितीच्या बैठकीत मांडला आहे.
विवेकानंद प्रतिष्ठानच्या वाघ नगरातील प्राथमिक शाळेत 21 रोजी स्कूल बस सुरक्षितता समिती सभा घेण्यात आली. या सभेला वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक, आर. टी. ओ. विभागाचे सहायक मोटर वाहन निरीक्षक गोपाल पाटील, शहर वाहतूक शाखेचे एम. जे. सय्यद, उपशिक्षणाधिकारी पी.एस सानप, मुख्याध्यापक हेमराज पाटील, इंग्लिश मीडिअमचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर वाघ, काशिनाथ पलोडचे प्राचार्य प्रवीण सोनवणे, प्रशासकीय अधिकारी दिनेश ठाकरे, वाहन विभागप्रमुख मिलिंद पुराणिक, ग्रामपंचायत सदस्या रीता पवार, समन्वयिका वैशाली पाटील, रत्नमाला पाटील, संतोष चौधरी उपस्थित होते मागील सभेचे इतिवृत्त वाचन संजय भोंडे, सचिन गायकवाड यांनी केले.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षितता व वाहतुकीसंदर्भात चर्चा व निर्णय घेण्यात आले. यात व्हॅन वाहनचालकांनी आवश्यक प्रमाणपत्रांची तसेच प्रथमोपचार पेटी, अग्निशमन व्यवस्था, स्पीड गव्हर्नरबाबत शासकीय नियमानुसार आवश्यक बाबींची पूर्तता कशी असली पाहिजे यावर चर्चा केली. 18 वर्षाखालील मुलांना वाहने देऊ नका यावेळी माहिती देताना एमजी सय्यद यांनी अठरा वर्षाच्या आतील विद्यार्थ्यांना पालकांनी वाहन देऊ नये. ते कायद्याने गुन्हेगारास पात्र असल्याचे सांगीतले.व्हॅनमध्ये ऑडीओवर ऐकवा पाढे
जिल्हा परिषदेच्या उपशिक्ष्ाणाधिकारी पी.एस.सानप यांनी विद्यार्थ्यांच्या व्हॅनमध्ये पाढे तसेच शैक्षणिक बालगीते ऑडिओ स्वरूपात ऐकविले जावेत, असा प्रस्ताव ठेवला. यामुळे विद्यार्थ्याचे पाढे व शैक्ष्ाणिक बालगीतांचे अध्ययन अधिक पक्के होण्यास मदत होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
एरियानुसार ठरवले स्कूल व्हॅन शुल्क
या शैक्षणिक वर्षात एरियानुसार व्हॅन भाडे निश्चित करण्यात आले. विद्यार्थी बसचालक , सहाय्यक यांच्या प्रथमोपचार तसेच वाहतूक नियमासंदर्भात देखील त्यांची ज्ञानाची उजळणी करणे यासाठी विविध प्रशिक्षण घेण्याबाबत चर्चा झाली. सुरक्षितेच्या दृष्टीने आपत्कालीन व्यवस्थेसाठी शाळेचा नंबर तसेच 112 टोल फ्री नंबर व सहायता वाहन विभाग यांच्याशी संपर्क करावा, असे सांगण्यात आले. सूत्रसंचालन व आभार हेमराज पाटील यांनी मानले.