यावल : यावल तालुक्यातील डांभूर्णी येथील १७ वर्षीय अल्पवयीन मुलीच्या अपहरण प्रकरणी पोलिसांनी मुख्य संशयीतास अटक केली. अल्पवयीन मुलीसदेखील ताब्यात घेण्यात आले आहे. अटकेतील २७ वर्षीय तरुणास भुसावळातील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाच्या विशेष बाल न्यायालयात हजर केले असता त्यास ८ फेब्रुवारीपर्यंत दोन दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
विशेष स्वतःचे लग्न पंधरा दिवसावर असतांना या रुणाने अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याचा प्रकार समोर आला होता. दुचाकीवरून येत डांभूर्णीतील अल्पवयीन तरुणीला पळवले डांभूर्णी, ता.यावल या गावातून दिनांक २१ जानेवारी रोजी १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याने अज्ञाताविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास करतांना पोलिसांनी प्रारंभी डांभूर्णी गावातील धम्मदीप सुधाकर जंजाळे (२१) या तरुणाला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने सांगितले की, प्रवीण प्रकाश सोळुंके (रा. डांभूर्णी) याने अत्पवयीन मुलीचे त्यांच्या दुचाकी (क्रमांक एम.एच.१९ई.सी.६६५८) द्वारे अपहरण केले होते. पोलिसांनी प्रवीण सोळंके याचा शोध लावत्यानंतर त्याच्यासह पीडीत अल्पवयीन मुलीला ताब्यात घेतले व पीडीत अल्पवयीन मुलीस बाल समितीकडे सोपवण्यात आले. प्रवीण साळुंके यास अटक करीत त्याला भुसावळ येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाच्या विशेष बाल न्यायालयात न्या.व्ही.सी. बर्डे यांच्या समोर हजर केले असता गुरुवार, ८ फेब्रुवारीपर्यंत दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
पुढील तपास पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सुनील मोरे, श्याम धनगर करीत आहे.स्वतःचे लग्न सोडून अल्पवयीनचे अपहरण संशयीत आरोपी प्रवीण सोळंके यांचे लग्न ४ फेब्रुवारीला नियोजित होते. या लग्नाचा बस्ता फाडला गेला. लग्नाच्या पत्रिका वाटल्या गेल्या. असे असतांना लग्न पंधरा दिवसावर असतांना २१ जानेवारी रोजी या तरुणाने पीडीत १७ वर्ष ९ महिने वयाच्या अल्पवयीनचे अपहरण केले. आता संशयिताविरूध्द बालकांचे लैगिंक अत्याचारापासून संरक्षण कायदा पोस्कोन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.