जळगाव :’ दोन वर्षासाठी हद्दपार गुन्हेगार पोलिसांना गुंगारा देत शहरात आला. सुप्रिम कॉलनी मच्छी बाजारात तलवार मिरवित त्याने दहशतीचा प्रयत्न केला. या प्रकाराची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. पथकाने घटनास्थळी धाव घेत तलवारी दिनकर उर्फ पिन्या रोहिदास चव्हाण (२६) रा. सुप्रिम कॉलनी याला ताब्यात घेतले. विविध गुन्ह्यांमुळे समाजाला तसेच कायदा सुव्यस्थेता बाधा ठरत असलेला दिनकर उर्फ पिन्या चव्हाण याला एमआयडीसी पोलीस ठाण्याकडून दोन वर्षासाठी हद्दपार केले होते. त्याला जळगावमध्ये नोएन्ट्री होती.
पिन्या याने तलवार घेत बाजारात दहशत माजविली. त्याचा प्रताप पोलीस ठाण्यात पोहोचला. त्यानंतर पथक शोधार्य निघाले.पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना ही माहिती मिळाली, उपनिरीक्षक दीपक जगदाळे, सहायक फौजदार अतुल वंजारी, राहूत रगडे, सचिन पाटील, विशाल कोळी, सतीष गस्ने, मंदार पाटील यांचे पथक त्यांनी रवाना केले. सुधिम कॉलनी बाजारात तपासचक्रे फिरवित असताना पथकाला तलवारीसह दिनकर उर्फ पिन्या आढळला, पथकाने त्याला ताब्यात घेतले असता त्याच्याकडे तलवार मिळून आली. शत्र बाळगल्याप्रकरणी त्याच्या विरुध्द गुन्हा दाखल झाला आज न्यायालयात त्याला हजर केले असता त्याची कारागृहात रवानगी करण्याचे आदेश दिले.पिन्या याच्यावर एकुण विविध २२ गुन्हे दाखल आहेत.