---Advertisement---

जळगावात चाललंय तरी काय? मंत्र्यांच्या मुलीच्या छेडछाडीनंतर आता धरणगावातही घडला संतापजनक प्रकार, अल्पवयीन अत्यावस्थ 

---Advertisement---

Jalgaon News : राज्यात सध्या महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. जिल्ह्यातही महिला सुरक्षेचा प्रश्न गंभीर झालाय. नुकतीच मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी गावात संत मुक्ताई यात्रोत्सवात टवाळखोरांनी चक्क एका केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीची छेड काढली. ही घटना ताजी असताना असाच काहीसा प्रकार धरणगाव तालुक्यात उघडकीस आला आहे. या ठिकाणी टवाळखोरांच्या छेडछाडीला कंटाळून एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीने विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केलाय. सदरची घटना लक्षात घेता जळगावात चाललंय तरी काय? असा प्रश्न निर्माण होत आहे.

धक्कादायक असा हा प्रकार धरणगाव तालुक्यातील असून, येथील एका गावात टवाळखोरांनी अल्पवयीन मुलीच्या घरात घुसून मुलीची आणि तिच्या बहिणीची छेडखानी केली. एवढ्यावरच टवाळखोर थांबले नाही तर त्यांनी पीडित मुलगी व तिच्या बहिणीला देखील मारहाण केली.

या टवाळखोरांकडून वारंवार होणाऱ्या छेडछाडीला कंटाळून पीडित १५ वर्षीय अल्पवयीन मुलीने विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेत अल्पवयीन तरुणी अत्यावस्थ  झाली असून, जिल्हा रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणामुळे जळगावात एकच खळबळ उडाली आहे.

शाळेत, शेतात जाताना देत होता त्रास

या टवाळखोरांनी अल्पवयीन मुलीचे जगणे कठीण करत तिचा वारंवार छेड केला. अल्पवयीन तरुणी शाळेत, शेतात जाताना तिचा पाठलाग करून वारंवार त्रास देत होते. टवाळखोरांच्या या कृत्याला विरोध केल्याने टवाळखोरांनी थेट मुलीचे घर गाठत घरात अनुधिकृत प्रवेश करत पीडित मुलीची व बहिणीची छेडखानी करत बहिणीला मारहाण केल्याचा आरोप पीडित मुलीसह तिच्या पालकांनी केला आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment