---Advertisement---
Jalgaon News : जिल्हास्तरीय शेतकरी आत्महत्या समितीची बैठक मंगळवार २४ रोजी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यात २६ आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांकडून मदत अनुदान प्रस्ताव सादर करण्यात आले होते. त्यातील १६ प्रस्तावाना मान्यता देण्यात आली.
पात्र असलेल्या मदत अनुदान प्रस्तावात समाधान महादू महाले सातगाव ता. पाचोरा, गणेश युवराज खैरे सामरोद, शांताराम सुपडू आवारे किन्ही, मुन्ना उघडू बावरकर वडगाव टि.प्र. ता. जामनेर, अशोक अमृत लंके पथराड बु., दिपक बुधा भील तरडे खु. अशोक छगन महाजन अनोरे, धनराज योगराज सावंत चमगाव, राजेंद्र भगवान म हाजन, मनोज पूना केखरे, किरण पुंडलिक व-हाडे धरणगाव, ता.
धरणगाव, लिलाधर पांडुरंग पाटील भोकरी, बाजू पांडुरंग घुले निमखेडी बु. निलेश ज्ञानदेव बावस्कर रा. सुळे ता. मुक्ताईनगर, अरविंद तुकाराम पाटील आडगाव, रविंद्र हिरामण बाविस्कर रिंगणगाव ता. एरंडोल जि. जळगाव या कुटुंबांचा समावेश आहे. सादर प्रस्तावापैकी ७ प्रस्ताव अपात्र असून तालुकास्तरावर फेरचौकशीसाठी ३ प्रस्ताव पाठविण्यात आले असल्याचे जिल्हा प्रशासनाने म्हटले आहे.
सादर प्रस्तावापैकी ७ प्रस्ताव अपात्र असून तालुकास्तरावर फेरचौकशीसाठी ३ प्रस्ताव पाठविण्यात आले असल्याचे जिल्हा प्रशासनाने म्हटले आहे.