---Advertisement---

Jalgaon News: जिल्ह्यात 30 हजार जणांना झाला डोळ्यांचा संसर्ग

by team

---Advertisement---

जिल्ह्यात 30 हजार जणांना डोळ्याचे इन्फेक्शन झाले आहे. 30 हजारांपेक्षा अधिक रुग्णांचे डोळे आल्याने त्यांनी जिल्हाभरात प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेद्र, जिल्हा रुग्णालयातील ओपीडीमध्ये उपचार घेतल्याचे आरोग्य विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. शहरातील खाजगी रुग्णालये हाऊसफुल्ल झाली आहेत.
जिल्ह्यात सध्या डोळे येण्याची साथ ग्रामीण भागात सुरू झाली आहे.

त्यामुळे घराघरात डोळ्यांना इन्फेक्शन झाल्याचा रुग्ण आढळून येत आहे. त्यासाठी आरोग्य विभागाने उपाययोजना सुरू केल्या आहेत. डोळे आलेल्या रुग्णांना उपचार मिळावेत यासाठी जिल्ह्याभरातील प्रत्येक आरोग्य उपकेद्र, प्राथमिक आरोग्य केंद्रांना पुरेसा औषधांचा साठा उपलब्ध करण्यात आला आहे. जिल्हा परिषदेचे नूतन सीईओ श्रीअंकित यांनी यासंदर्भात आरोग्य विभागाचा आढावा घेतला. तसेच डोळ्यांचा संसर्ग झालेल्या रुग्णांना तातडीने उपचार मिळण्याची व्यवस्था करण्याची सूचना त्यांनी दिले आहेत.
डोळ्यातून पाणी येणे, डोळ्यांना खाज येणे, चिकटपण येणे, डोळ्यांना सूज येणे, डोळ्यांना सूज येणे, डोळे लालसर होणे आदी लक्षणे दिसून येतात. त्यासाठी डोळे स्वच्छ पाण्याने धुवावे, रुमाल, कपडे, टॉवेल इत्यादी स्वतंत्र ठेवावे. डोळ्यांना विषाणूजन्य संसर्ग अ‍ॅडिनो वायरसमुळे होतो. विशेषत: पावसाळ्यात याचा संसर्ग वाढतो.

लहान मुलांना सर्वाधिक संसर्ग
सध्या लहान मुलांंमध्ये सर्वाधि डोळ्याचा संसर्ग दिसून येत आहे. त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिकांमध्येही डोळे येण्याचे प्रमाण जास्त आहे. लहान मुलांमध्ये शाळा व सार्वजनिक ठिकाणी या डोळ्याचा संसर्ग होत आहे. त्यासाठी शाळा प्रशासनानेही मुलांचे डोळे आलेले असल्यास त्यांना शाळेत पाठवू नये, असे आवाहन केले आहे.

जिल्ह्यात सध्या डोळे येण्याचे प्रमाण वाढत आहे. त्याअनुषंगाने प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये डोळ्यासाठी लागणारे ड्रॉप, सतर औषधींचा साठा उपलब्ध करण्यात आला आहे. नागरिकांनी जागरूक राहावे. स्वत;च्या डोळ्याची काळजी घ्यावी.
– डॉ.सचिन भोयेकर, जिल्हा आरोग्य अधिकारी, जि.प.जळगावजिल्ह्यात

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---