चाळीसगाव ः दुचाकीद्वारे गुटख्याची वाहतूक करणाऱ्या दोघांना चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. चाळीसगाव ते वाघळी दरम्यानच्या बोरखेडा गावाजवळील हॉटेल रायगड येथे ही कारवाई करण्यात आली. संशयितांकडून 80 हजार 720 रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. चाळीसगाव ते वाघळी रस्त्यावरील बोरखेडा गावाजवळील हॉटेल रायगड येथून दुचाकीने गुटख्याची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती चाळीसगाव ग्रामीणचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाई करण्याच्या सुचना दिल्या. त्यानुसार पथकाने शनिवार, 21 ऑक्टोबर रोजी रात्री 11 वाजता कारवाई करत संशयित आरोपी अन्सारी सईद अहमद (34, जाफरनगर, मालेगाव) आणि शेख इरफान शेख युनूस (सायगाव, ता.चाळीसगाव) यांना अटक करीत त्यांच्याकडून 80 हजार 720 रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. हवालदार शांताराम सीताराम पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोघांविरोधात चाळीसगाव ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव करीत आहे.