Jalgaon News : भरणा केलेल्या व्यवसाय कराची ऑनलाईन पावतीचे बनावट दस्ताऐवज तयार केले. तसेच तो खोटा असल्याचे माहिती असतांना देखील तो खरा असल्याचे भासवून शासनाची फसवणुक करणाऱ्याचा प्रयत्न प्रादेशिक परिवहन विभागात उघडकीस आला होता.
याप्रकरणी कार्यालयातील कर वसुली अधिकारी यांनी दिलेल्या तक्रारीवरुन संशयित सुलतान बेग नझीर बेग मिर्झा (रा. उस्मानिया पार्क ) व शाकीब रहुफ शेख (रा. जारगाव चौफुली, पाचोरा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील संशयित सुलतान बेग मिर्झा याने अटकपुर्व जामीनासाठी अर्ज केला होता. त्याचा अटकपुर्व जामीन अर्ज जिल्हा न्यायालयाने फेटाळून लावला आहे. त्यामुळे पोलिसांना मिळून येत नसलेल्या सुलतान बेग मिर्झा याचा शोध सुरु असून त्याला अटक होवू शकते.