---Advertisement---

Jalgaon News: धक्कादायक ! जळगावात प्रेमभंगातून तरुणाने उचलले टोकाचे पाऊल

---Advertisement---

Jalgaon News: प्रेमविवाह केल्याच्या रागातून सीआरपीएफच्या निवृत्त जवानाने जन्मदात्या मुलीवरच गोळी झाडून हत्या केल्याची घटना ताजी असतांनाच पुन्हा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रेमभंग झाल्याने नैराश्यात आलेल्या तरुणाने नूतन मराठा महाविद्यलयाच्या आवारात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. धक्कदायक अश्या या प्रकारामुळे एकाच खळबळ उडाली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सतीश कोळी असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून त्याने आज रविवार 27 एप्रिल रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास जळगाव शहरातील नूतन मराठा महाविद्यालयाच्या आवारात गळफास घेत आत्महत्या केली.

सतीश हा नूतन मराठा महाविद्यालयाजवळ वसतिगृहात राहत होता. सकाळी त्याने महाविद्यालयाच्या पार्किंग परिसरात झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी सतीश कोळी याने इंस्टाग्राम अकाउंटवर स्टेटस ठेवत आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. तो अनाथ असल्याची माहिती त्याच्या मित्रांनी दिली आहे.

दरम्यान या तरुणाने आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या इंस्टाग्राम अकाउंट वर स्टेटस ठेवत आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. त्याची इंस्टाग्राम पोस्ट पाहून त्याच्या मित्रांच्या निदर्शनास ही बाबा आली. दरम्यान महाविद्यालय प्रशासनच्या निदर्शनास ही बाबा येताच त्यांनी पोलिसांना घटनेची माहिती कळवली.

घटनेची माहिती मिळताच जिल्हापेठ पोलिसांनी घटनस्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात रवाना केला. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment