वाधुळे: एमआयडीसीच्या भूखंडावर वाढीव बांधकामाचे काम मंजूर करण्यासाठी 25 हजारांची लाच मागून ती कार्यालयातच स्वीकारताना धुळे एमआयडीसीतील सिव्हील इंजिनिअर अहमद वफा अहमद हसन अन्सारी (32, ईस्लामपूरा शाळा नंबर 10 जवळ, धुळे) यास धुळे एसीबीने बुधवारी सायंकाळी लाच स्वीकारताच अटक केली. या कारवाईने एमआयडीसीतील लाचखोरांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली.
असे आहे लाच प्रकरण
42 वर्षीय तक्रारदार यांचे अवधान एमआयडीसी येथील भूखंडावर वाढीव बांधकाम मंजूरीचे काम कार्यकारी अभियंता, एमआयडीसी धुळे यांच्याकडे प्रलंबित होते. त्यासाठी अन्सारी यांनी एमआयडीसी कार्यालयातील अधिकार्यांवर त्यांचा प्रभाव वापरून काम करून देण्यासाठी 25 हजारांची लाच बुधवारी मागितली होती. तक्रारदाराला लाच द्यावयाची नसल्याने त्यांनी धुळे एसीबीकडे तक्रार नोंदवण्यात आली. बुधवारी दुपारी कार्यालयाजवळ लाच स्वीकारताच अन्सारी यास अटक करण्यात आली.
यांनी केला सापळा यशस्वी
हा सापळा धुळे पोलीस उपअधीक्षक अभिषेक पाटील यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक हेमंत बेंडाळे, पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी, हवालदार राजन कदम, शरद कटके, संतोष पावरा, मकरंद पाटील, प्रशांत बागुल चालक हवालदार सुधीर मोरे आदींच्या पथकाने यशस्वी केला.
ला