---Advertisement---

Ambedkar Jayanti 2025: महामानव डॉ. आंबेडकर जयंती उत्साहात, बाबासाहेबांचे विचार प्रेरणादायी – पालकमंत्री

by team
---Advertisement---

Ambedkar Jayanti 2025: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला सामाजिक न्याय, समता, बंधुता व धर्मनिरपेक्षतेचा संदेश आजही मार्गदर्शक आहे. भारतीय संविधानाच्या माध्यमातून त्यांनी सर्वसामान्यांना हक्क व अधिकार बहाल केले. त्यांचे विचार आणि कार्य सदैव प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.

जिल्हा प्रशासन


भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त जिल्हा प्रशासन, जळगाव शहर महानगरपालिका व सामाजिक न्याय विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जळगाव रेल्वे स्थानकाजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करताना भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या. यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, विविध शासकीय अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जिल्हा प्रशासन


जिल्हा प्रशासन व सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाधिकारी कार्यालय नियोजन समिती सभागृहात उत्साहात व शिस्तबद्ध वातावरणात डॉ. आंबेडकर यांच्या विचारांचा जागर करण्यात आला.
यावेळी आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल, समाजकल्याण सहाय्यक आयुक्त योगेश पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुर्बान तडवी आदी मान्यवरांसह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचीही उपस्थित होते.

विचार प्रेरणा व्याख्यानात धरणगाव महाविद्यालयाचे माजी प्राचार्य प्रा. बी. एन. चौधरी बाबासाहेबांच्या शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक सुधारणा कार्याचा आढावा घेत प्रेरणा दिली.
समाजकल्याण विभागामार्फत विविध योजनांच्या लाभांचे प्रातिनिधिक वितरण करण्यात आले. यात उसतोड कामगारांच्या वारसांना अर्थसहाय्य, परराज्य शिष्यवृत्ती आणि स्वाधार योजनेतील लाभांचे प्रमाणपत्र, कन्यादान योजना व वसतीगृह प्रवेश प्रमाणपत्रांचा समावेश होता. तसेच काही विद्यार्थ्यांना जात पडताळणी प्रमाणपत्रे आणि कर्मचाऱ्यांना प्रशस्तीपत्रे देण्यात आली. डॉ. आंबेडकरांना अभिवादनासोबतच त्यांच्या विचारांचा प्रसार, सामाजिक समतेला चालना, वंचित घटकांना शासकीय योजनांचे लाभ देणे हा या कार्यक्रमाचा उद्देश होता. कार्यक्रम यशस्वीतेसाठी जिल्हा प्रशासन आणि समाजकल्याण विभागाने समन्वय साधत नियोजन केले.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment