Jalgaon News: वृद्ध आईचा आधार हरपला, मुलाची आत्महत्या

जळगाव : रात्रीच्या वेळी घरच्या गच्चीवर जाऊन भूषण दादा तांबे( रा खडके चाळ , शिवाजीनगर) या तरुणाला गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्याचे कारण अजून समजू शकले नाही आहे.  पोलिसात अकस्मात मृत्यू ची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहिती नुसार खडके चाळ मध्ये भूषण तांबे हा आपल्या आई राहत होता. शुक्रवारी रात्री त्याने त्याच्या आई सोबत जेवण केलं आणि  तो रात्री गच्चीवर गेला व त्यानें आसारीला रुमाल बांधून  गळफास घेतल्याचे समोर आले. सकाळी ६;४५ वाजता शेजारील महिलेला हा तरुण लटकलेल्या दिसून आला त्या महिलेने तरुणाच्या घरी सांगतले त्यावेळे भूषणाच्या भाच्या ने शहर पोलिसात माहिती दिली या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू ची नोंद करण्यात आली आहे.