जळगाव: गॅलरीतून पत्नीला घरात पाठवून पतीने घराच्या गॅलरीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवार 21 रोजी मध्यरात्रीनंतर शहरातील वाल्मीकनगरात घडली. कैलास प्रकाश मोरे (42) असे मृत तरुणाचे नाव आहे. चेतन, पंकज तसेच कैलास असे तिघे बंधू तीन मजली घरात राहतात. तिसऱ्या मजल्यावर कैलास व त्याची पत्नी मीनाक्षी असे राहत होते.
खालच्या मजल्यावर कैलासचे दोघे बंधू स्वतंत्ररित्या कुटुंबासह वास्तव्यास आहेत. गुरुवार, 21 रोजी रात्री कैलास तसेच त्याची पत्नी गॅलरीत बसले होते. कैलास यानी पत्नीला आतमध्ये पाठविले व घराचा दरवाजा बाहेरून बंद केला. गॅलरीत छताच्या हुकच्या सहाय्याने साडी गळ्याला आवळून त्यांनी आत्महत्या केली. दरवाजा उघडत नसल्याने पत्नीने आरडाओरड केली.
कुटुंबातील सदस्यांनी कैलास याना शासकीय रुग्णालयात आणले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषीत केले. कैलास हे सेट्रींग काम करुन कुटुंबाचे उदरनिर्वाह करत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन भाऊ, मोठी बहिण आरती तसेच आई कमलबाई असा परिवार आहे. याप्रकरणी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.