जळगाव: शहरातील तांबापूर परिसरात चक्रे फिरवून सुरत येथे लपलेला इश्तीयाक अली राजीक अली याला एमआयडीसी पोलिसांच्या पथकाने ताब्यात घेतले. इश्तीयाक हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्या तीन साथीदारांनाही अटक केली. यात एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे.तांबापुरातील पटेल गल्लीत वयोवृध्द महिला तसलीम बी मोहम्मद सैय्यद (60) राहतात. बकरी ईद सणानिमित्ताने त्या घराच्या दरवाजाला कुलूप लावून धुळे येथे त्या मुलीकडे गेल्या होत्या. ही संधी हेरून चोरट्यांनी 26 जुन ते8 जुलै 2023 दरम्यान कुलूप कोयंडा तोडून घरातून 23 हजार किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने तसेच 25 हजाराची रोकड असा एकूण 48 हजार रूपयांचा मुद्देमाल चोरून नेला.
याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. ही चोरी रेकॉर्डवरील गुन्हेगार इश्तीयाक अली राजीक अली याने त्याच्या साथीदारांना सोबत घेऊन केली. त्यानंतर तो सुरत येथे लपून बसल्याची गोपनीय माहिती पोनि जयपाल हिरे यांना मिळाली. त्यांनी पथक नियुक्त केले. त्यानुसार हेकॉ रामकृष्ण पाटील, पोना सचिन पाटील, पोकॉ मुकेश पाटील, छगन तायडे यांचे पथक रवाना झाले. सुरत येथे पथकाने शोध घेत संशयिताला ताब्यात घेऊन जळगावला आणले.
पथकाने त्यानंतर त्याच्या साथीदारांचा शोध घेत हसीनाबी राजीक अली (55) रा.शाहअवलीया मशीदजवळ, तांबापुरा, अनिस हमीद शेख (31) रूबी अपार्टमेंट शिरसोली नाक्याजवळ तसेच अल्पवयीन बालक यांना ताब्यात घेतले. त्यांनी गुन्ह्याची कबुली देत 5 हजार रोख, 5 हजार किमतीचे 100 ग्रॅम वजनाच्या चांदीच्या पायातील साखळ्यांचा जोड, 12 हजार किमतीचे चार ग्रॅम वजनाची सोन्याची पोत असा 22 हजार किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला. ही कारवाई पोउपनि दीपक जगदाळे, हेकॉ रामकृष्ण पाटील, सचिन पाटील, अल्ताफ पठाण, सचिन मुंढे, मुकेश पाटील, छगन तायडे, योगेश बारी यांनी के