Jalgaon News: घरगुती गॅस वाहनांमध्ये भरणे पडले महागात; पोलिसांत गुन्हा दाखल

वाहनांमध्ये घरगुती गॅसचा काळाबाजार करून भरताना दोन वेगवेगळ्या घटनांमधून 65 हजार 200 रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहरातील जळगाव शहरातील अजिंठा चौकातील मुरली मनोहर हॉटेलच्या मागे आणि एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जळगाव तोल काटा परिसरात कारवाई करण्यात आली. यात पोलीस उपअधीक्षक संदीप गावीत यांना घरगुती गॅस हा बेकायदेशीरित्या इतर वाहनामध्ये भरत असल्याची गोपनिय माहिती मिळाली. यानुसार त्यांनी तत्काळ पथकाला कारवाईच्या सूचना दिल्या.

यात पथकाने शुक्रवारी पहिली कारवाई 11 ऑगस्ट रोजी दुपारी 1 वाजेच्या सुमारास अजिंठा चौकातील मुरली मनोहर हॉटेलच्या मागे असलेल्या एका पत्र्याच्या शेडमध्ये करण्यात आली. यात संशयित म्हणून वसीम कदीर पटेल (वय 25 रा. मेहरूण, जळगाव) हा अवैध्यरित्या घरगुती गॅस इतर वाहनांमध्ये भरताना आढळला. येथून पोलीसांनी गॅस भरण्याचे साहित्य, व्हॅक्यूमपंप, गॅसहंड्या, वजन काटा असा एकुण 30 हजार 100 रूपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. दुसर्‍या घटनेत अवैधरित्या घरगुती गॅस इतर वाहनांमध्ये भरताना आढळून आला.

याठिकाणी पोलीसांनी गॅस भरण्याचे साहित्य, व्हॅक्यूमपंप, गॅसहंड्या, वजन काटा असा एकूण 30 हजार 100 रूपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. दुसरी कारवाई दुपारी अडीच वाजता जळगाव तोल काटाजवळील आडोश्याला असलेल्या टपरी येथे केली. याठिकाणी संशयित शेख आसी शेख शकिल (वय 18 रा. मास्टर कॉलनी, जळगाव) हा देखील इतर वाहनात घरगुती गॅस भरताना दिसून आला.

पोलिसांनी कारवाई करून त्याच्याजवळील 35 हजार 100 रूपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. पोलिसांनी दोन्ही कारवाई एकूण 65 हजार 200 रूपयांची मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. पोकॉ सचिन साळुंखे, पोकॉ राहुल पाटील यांनी दिलेल्या वेगवेगळ्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

यांच्या पथकाने केली कारवाई
पोलीस उपअधीक्षक संदीप गावीत, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस पथकातील पोकॉ सचिन साळुंखे, पोकॉ राहुल पाटील, पो.ना. श्रीकांत ब्रदर, पो.कॉ. शिवाजी हटकर, पो.कॉ. ज्ञानेश्वर हटकर, पो.कॉ. ईश्वर भालेराव, किशोर पाटील, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोकॉ अल्ताफ पठाण यांनी केली