Jalgaon News : कॅन्सर प्रतिबंधात्मक एचपीव्ही लसीकरणात जळगाव जिल्हा राज्यात अव्वल

---Advertisement---

 

Jalgaon News : महिलांमध्ये वाढत्या प्रमाणात आढळणाऱ्या गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरला प्रतिबंध करण्यासाठी राज्यभर एचपीव्ही लसीकरण मोहिम राबविण्यात येत आहे. गर्भाशय मुखाचा कॅन्सर प्रतिबंधात्मक एचपीव्ही लसीकरण मोहिमेत जळगाव जिल्ह्याने उल्लेखनीय कामगिरी करत राज्यात प्रथम क्रमांक मिळविला असून जळगाव जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या प्रभावी नियोजन व जनजागृतीमुळे आतापर्यंत २,२९३ मुलींचे लसीकरणाचा लाभ देण्यात आला आहे.

देशात महिलांमध्ये गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरचे प्रमाण वाढत असल्याने केंद्र व राज्य शासनाने लसीकरण मोहीम हाती घेतली आहे. मात्र, या लसीकरणाबाबत नागरिकांमध्ये असलेल्या विविध संभ्रमांमुळे अनेक ठिकाणी मोहिमेचा वेग मंदावलेला असल्याचे दिसून आले आहे.

असे असले तरी जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी आरोग्य यंत्रणेला विश्वासात घेत महिला व मुलींना उद्भवणाऱ्या गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर प्रतिबंधात्मक एचपीव्ही लस, प्रभावी जनजागृती मोहीम राबविण्याचे निर्देश दिले. नागरिकांमधील गैरसमज दूर करून एचपीव्ही लसीकरणाबाबत विश्वास निर्माण करण्यात आल्याने जिल्ह्यात गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर प्रतिबंधात्मक एचपीव्ही लसीकीण मोहिमेला गती मिळाली.

४१ हजार लसीकरणाचे उद्दीष्ट

जळगाव जिल्ह्यासाठी एकूण ४१ हजार लसीकरणाचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असून, त्यापैकी आतापर्यंत २,२९३ लसीकरण पूर्ण झाले आहे. या मोहिमेची सुरुवात ८ मार्च २०२६ रोजी जामनेर तालुक्यातील नेरी प्राथमिक आरोग्य केंद्रात मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांच्या उपस्थितीत करण्यात आली. आगामी पुढील तीन महिन्यांपर्यंत ही मोहीम सुरू राहणार आहे.

राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत जळगाव जिल्हा आघाडीवर असून २ हजार २९३ तर, दुसऱ्या क्रमाकांवर ठाणे जिल्हा १ हजार ९९९ लसीकरण झाले आहे. तसेच नागपूर जिल्हयात आतापर्यंत १ हजार २३४ लसीकरण झाले असून तिसऱ्या क्रमांकावर आहे. जळगाव जिल्ह्यातील एचपीव्ही लसीकरण मोहिमेच्या उल्लेखनीय यशाबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर तसेच त्यांच्या संपूर्ण आरोग्य पथकाचे अभिनंदन करून पुढील उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी असेच प्रयत्न सुरू ठेवण्याचे आवाहन केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---