---Advertisement---
Jalgaon News: जळगाव येथील आसोदा रेल्वे गेटवरील उड्डाण पुलाचे काम निकृष्ट झाले आहे. जवळपास ३३ कोटी रुपये खर्च करुन तयार करण्यात आलेल्या पुलाला मधोमध खड्डा पडला आहे. मोठा गाजावाजा करुन वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेल्या या पुलाची अल्पावधीत झालेली ही अवस्था चर्चेचा विषय बनला आहे.
मध्य रेल्वेच्या इगतपुरी भुसावळ विभागावरील जळगाव रेल्वे स्थानक आणि भादली रेल्वे स्थानकादरम्यान महाराष्ट्र रेल्वे पायाभूत सुविधा विकास महामंडळ (महारेल) द्वारे असोदा रेल्वे उड्डाण पुलाचे काम करण्यात आले आहे.
हा असोदा रेल्वे गेटवरील पुल सातशे मीटर लांबिचा असून हा पूल दोन लेनमध्ये तयार करण्यात आला आहे. यासाठी जवळपास ३३ कोटी रुपयांच्या निधी खर्च करण्यात आला आहे. मे २०२४ मध्ये हा पूल रहदारीसाठी खुला करण्यात आला.
रस्त्याच्या मधोमध पडला खड्डा
असोदा उड्डाण पूल रहदारीस खूला करुन जवळपास दीड वर्षाचा कालावधी झाला आहे. मात्र, उल्पावधीतच या पुलाच्या कामाचे पितळ उघडे झाले आहे. पुलाच्या असोदाकडे जाणाऱ्या उतारावर रस्त्याच्या मधोमध खड्डा पडल्याचे चित्र आहे. हा रस्ता खचल्याची स्थिती असून सतत वाहणाऱ्या वहनांमुळे खड्डा वाढत आहे. दि. ३ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी हा खड्डा पडला आहे. मात्र, उशीरापर्यंत याबाबत प्रशासनाचे कुठलीही उपाययोजना केली आहे. किंवा खड्ड्याच्या सभोवताली बॅरेकेट्स लवण्याची तसदी देखील प्रशासनाने प्रशासनाची भुमिका व कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
---Advertisement---