जळगाव: आता गणेशोत्सव काही दिवसांवरती आला आहे. या गणेशोत्सवासाठी सर्वच प्रशासनाकडून तयारी सुरु आहे, तर या पार्श्वभूमीवर जळगाव शहर पोलीस प्रशासन देखील कामाला लागले आहे. अश्यातच पोलीस प्रश्नांची नुकतीच एक बैठका पार पडली.
गणेशोत्सव सर्वांचाच, मग सर्वांसोबत साजरा करुयात. आपल्यासारखे इतरही जळगावकर असतील. ते उत्सवाचा आनंद लूटायला येतील. त्यांच्या सुरक्षेची आणि शांततेची जबाबदारी आपली आहे. बंदोबस्त हे पोलिसांचे कामच आहे. पण, यंदा गणेशोत्सवासाठी मी आईला बोलावले आहे.त्यामुळे मीसुद्धा बंस्तोबस्तात २४ तास तैनात राहण्याऐवजी साध्या वेशात कुटूंबासोबत गणेशोत्सवात सहभागी होईल. सर्वच पोलिस बांधवांनाही आनंदात सहभागी होऊ द्या, अशी भावनीक साद पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांनी गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांना घातली.
पोलीस प्रशासनाकडून शनिवारी संध्याकाळी पोलीस मंगलम हॉलमध्ये शांतता समितीची बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किसनराव नजन पाटील, शहरातील पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी, सार्वजनिक गणेश महामंडळाचे पदाधिकारी, विविध गणेश मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, मुस्लीम समाजाचे प्रतिनिधी आदी या वेळी उपस्थित होते.
त्यावर, आमदार राजुमामा भोळे यांनी, मंडळांसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवायचे असतील, तर आपण सहकार्य करण्यास तयार असून, आपण सांगाल तेवढ्या कॅमेऱ्यांचा निम्मा खर्च देण्याची तयारी असल्याचे सांगितले. उपविभागीय अधिकारी संदीप गावीत म्हणाले कि जर मंडप आणि बाहेरील परिसरावर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत. हे कॅमेरे नंतर पेालिस दलाकडून शहरासाठी वापरले जातील, असे आवाहन त्यांनी केले.
वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या मंडपावर कारवाई! पोलिस आयुक्तांचा गणेश मंडळांना इशारा
बैठकीतील सूचना
* मंडळ उभारताना कमीत कमी एक रुग्णवाहिका जाऊ शकेल इतकी जागा मोकळी असू द्या.
* बॅनरबाजी करणे, झेंडे लावण्याची ही वेळ नाही.
* विद्युत पुरवठा खंडित होणार नाही, याची महावितरणने काळजी घ्यावी.
* दोन्ही वेळच्या पूजेत महिला, सैनिक, माजी सैनिक, समाजातील दुर्लक्षीत लोकांचा सहभाग वाढवावा.
* मंडळांनी आपापल्या गणेश मूर्तींची काळजी घ्यावी
* निर्माल्य रथ आरोग्य विभागाचा नव्हे, तर बांधकाम विभागाचा असावा
* सर्व मंडळांनी मंडपाबाहेर शहिदांच्या स्मरणार्थ एक बॅनर लावावे
* नविन मंडळांनाही विसर्जन मिरवणुकीत सहभागाची परवानगी मिळावी.