जळगाव : काहीच दिवसानआधी केंद सरकारने गॅस सिलिंडरचे २०० रुपये कमी करून गृहिणी खूश केले आहे. पण आता श्रावण महिना आणि सणासुदीच्या वेळेस साखरेचे आणि तूरडाळचे भाव मोठया प्रमाणात वाढले आहेत. नोकरदारांपासून सर्वसामान्यांचेही बजेट कोलमडले आहे.
आणि आता आणखी दर वाढण्याची शक्यता आहे. असे व्यापाऱ्यांनी सांगितले आहे घाऊक बाजारात वाढत्या दरवाढीत साखरेला मागणी कमी आहे. साठेबाजीमुळे साखरदरात वाढ होत आहे क्विंटलमागे पुन्हा १०० रुपयांनी भाव वाढले असून, घाऊक बाजारात साखरेचे दर क्विंटलला ६० ते ७५ रुपयांनी पुन्हा कडाडले असून, दर ४०७० ते ४०८० रुपयांवर पोहचले आहेत.याशिवाय रोजच्या वापरातील तूरडाळ १७५ ते १८० रुपये किलोंवर पोहचली असून
नागरिक हतबल होण्याची वेळ आली आहे. साखरेचे प्रतिकिलोचे दर आता ४२ ते ४३ रुपयांवर पोहचले आहे. या भाववाढी मुळे सामान्य नागरिक चिंतामध्ये पडले आहेत. यंदाच्या हंगामात ऊस उत्पादन कमी झाल्याचा अंदाज असल्याने साखरेचे दर हे मोठ्या प्रमाणात राहण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे साठेबाजी करणाऱ्यांनी साखरेची साठवणूक सुरू केली आहे. साठेबाजी मागील काही महिन्यांपासून निविदांमध्ये खरेदी केलेली साखर ही कमी भावाची आहे.ऐन सणासुदीत तूरडाळ महाग झाली आहे. दोन महिन्यांपूर्वी १०० रुपयांवर असलेली तूरडाळ आता १७५ ते १८० रुपये किलोवर गेली आहे. तर अन्य डाळींच्या दरातही वाढ झाली आहे.