Jalgaon news: ‘राम’ नाम शक्तीकारक : दादा महाराज जोशी

Jalgaon news:  ‌‘राम राम जय श्रीरामा’च्या जय घोषात चिमुकले राममंदिराचे दादा महाराज जोशी यांच्या मधूरवणीत पाच दिवशीय कथेला मोठ्या उत्साहात सुरूवात झाली. कथेच्या प्रथम दिवशी रघुकुल परिचय, गंगा अवतरण या विषयांवर त्यांनी निरुपण केले. यात त्यांनी रामायणाचा आधार घेत आई, वडिल, भाऊ-बहिण, भाऊ-भाऊ, पती-पत्नी यांच्या नात्यांसंबंधांचे महत्त्व विषद केले. राम हा शब्द शरीरातील अग्नी प्रज्वलीत करतो. ही अग्नी शरीराला बलवान करुन प्रतिकार शक्ती वाढवते अन्यथा प्रतिकार शक्ती कमी होते, राम नाम हे शक्तीकारक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


अयोध्यानगरीत श्रीराम मंदिराचा ऐतिहासिक प्राणप्रतिष्ठा सोहळा 22 जानेवारी रोजी होत आहे. यापार्श्वभूमींवर शिवतीर्थ मैदान येथे श्रीराम कथेचे आयोजन करण्यात आले आहे. तत्पूर्वी चिमुकले राम मंदीर येथे दुपारी 12.15 वाजता श्रीराम कथेचे आयोजक तथा श्रीराम महापूजा सेवा समिती प्रमुख आमदार सुरेश भोळे व माजी महापौर सीमा भोळे यांच्या हस्ते पूजन करण्यात आले.

 

 

यांनतर प्रभू श्रीरामांची महाआरती करण्यात आली. आमदार भोळे यांनी श्रीराम गाथा आपल्या डोक्यावर घेऊन फुलांनी सजविलेल्या बग्गीत विराजमान केली.चिमुकले राम मंदिर येथून वाजत गाजत ढोल ताशांच्या गजरात श्रीराम गाथेचे कथास्थळ शिवतिर्थ मैदाने येथे दुपारी 1 वाजता आगमन झाले. या मिरवणूकीत सहभागी श्रीराम, सीतामाता, श्री लक्ष्मण, हनुमंत यांची वेशेभूषा केलेली बालकांनी सर्वांचे लक्ष वेधले होते. श्रीरामाची वेशभूषा भूमी मदन जोशी, सीतामाता खुशी मदन जोशी, लक्ष्मण हर्ष जोशी तर हनुमंताची वेशभूषा मधूर मदन जोशी याने साकारली. दुपारी दोन ते पाच वाजेपावेतो भव्य श्रीराम कथेचे निरुपण चिमुकले राममंदिराचे दादा महाराज जोशी हे करत आहेत.

कारसेवकांचा हृदयस्पर्शी सत्कार
दरम्यान, कथा कार्यक्रमात कारसेवक, रामाचे गित म्हणणारे, विद्यार्थी, राम कविता लिहिणारे कवी, रामभक्त तसेच ढोलपथकातील कलावंताचा आमदार सुरेश भोळे यांच्या ह्स्ते सत्कार करुन कृतज्ञता व्यक्त केली. यात कारसेवा समिती संयोजक उदय भालेराव, मुकुंद मेटकर, दीपकराव घाणेकर, मंगेश कुलकर्णी, शशिकांत पाटील, रमेश जोगी, संजय सोनवणे, राजू मांढरे, सुशील भावसार, राजेंद्र मराठे, गीताजंली ठाकरे, हेमंत गौड, दिनेश गौड, नितीन चिंचोले, अभय कुलकर्णी, किरण बारी, शशिकांत रामदास पाटील, अभय सुरेश कुलकर्णी, भगवान सुर्जन सोनवणे, दिलीप बक्सु सपकाळे, चिंतमण भिवसन बाविस्कर, नामदेव उखा सपकाळे, महेश रामचंद्र सोनवणे आदी कारसेवकांचा सत्कार करण्यात आला. यासोबत दिवंगत कारसेवकांना श्रद्धांजली अपर्ण करण्यात आली. सर्वात ज्येष्ठ कारसेवक 94 वर्षीय सुलोचनाताई व दिपक घाणेकर यांचा सन्मान करण्यात आला.

विलास भावसार आता घालणार पादत्राण
विलास अंबादास भावसार यांनी अयोध्येत आपली पादत्राणे सोडली होती, जोपर्यंत प्रभू श्रीरामाच्या मंदिराचे निर्माण होत नाही तोपर्यंत आपण पादत्राणे घालणार नाही अशी प्रतिज्ञा केली होती त्यांना सोमवार, 22 रोजी पादत्राणे सन्मानपूर्वक देण्यात येणार आहेत.

श्रीराम कथा समिती आयोजक
प्रमुख रामभक्त ना. गिरीष महाजन, आ. सुरेश भोळे , नितीन लढ्ढा, राजू बांगर, अशोक जाजू,  देवेंद्र अग्रवाल, अशोक राठी, श्याम जोशी, संजय व्यास, यशवंत बारी, नितीन पाटील, मनीष बाहेनी, श्रीनिवास व्यास, रामदयाल सोनी, पवन अग्रवाल, सुरेंद्र अग्रवाल, विशाल भोळे आणि शिवमहापुराण सेवा समिती व आ. राजूमामा भोळे मित्रपरिवारातर्फे आयोजन करण्यात आले आहे.