---Advertisement---

‌jalgaon news: ‘नकोशा’ मुलीची नराधम पित्याने केली हत्या

by team

---Advertisement---

जळगाव :  दोन मुलींच्या पाठीवर झालेले अपत्य मुलगा होईल ही आस धरून असलेल्या पित्याने तिसरीही मुलगी झाल्यानंतर तिची हत्या केल्याची संतापजनक घटना जामनेर तालुक्यात घडली. विशेष म्हणजे नवजात आठ दिवसीय बालिकेच्या तोंडात नराधम पित्याने चक्क तंबाखू टाकली. हरिनगर तांडा, ता.जामनेर येथे रविवारी हा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी गोकुळ गोटीराम जाधव (30) असे या नराधम पित्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास अटक करण्यात आली.

आशा सेविकांच्या सतर्कतेने प्रकार उघडकीस-वाकोदजवळ हरिनगर तांडा (ता. जामनेर) येथील रहिवासी गोकुळ जाधव याला दोन मुली आहेत. शनिवार, 2 सप्टेंबर रोजी वाकोद प्राथमिक आरोग्य केंद्रात तिसरे अपत्य मुलगी जन्माला आल्यानंतर रविवारी चिमुरडीची गोकुळने हत्या केली. आशा सेविका या नवजात अर्भकांच्या जन्माची नोंद घेण्यासाठी गोकुळच्या घरी गेल्या, त्यावेळी चिमुरडी तिथे नव्हती. आशा सेविकेने ही माहिती वरिष्ठांना कळवली. वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप कुमावत यांनी मंगळवारी गावात पोहोचले. त्यांना सुरुवातीला चिमुरडीच्या आजारपणाने मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. डॉ. कुमावत यांनी त्याला विश्वासात घेऊन विचारपूस केली. त्यावेळी त्याने चिमुरडीला मारल्याची कबुली दिली.

 

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---