---Advertisement---

जळगाव : ‘या’ दिवशी आधार कार्ड अद्यावतीकरण विशेष मेळावा

by team
---Advertisement---

तरुण भारत लाईव्ह | जळगाव : डाक विभागामार्फत जळगाव मुख्य डाकघर येथे २४ ते २८ जुलै दरम्यान सकाळी १० वाजेपासून ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत आधारकार्ड अद्यावतीकरण विशेष मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
आधार अद्यावत करण्यासाठी विविध ठिकाणी अनेक अडचणी निर्माण होत असल्याने नागरिकांच्या कामात

विशेषत: विद्यार्थ्याना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. तसेच शासनाने १० वर्षे जूने आधार कार्ड प्रामुख्याने अद्यावत करणे अनिवार्य असल्याबाबतच्या सूचना देखील दिलेल्या आहेत. त्यावर तोडगा म्हणून डाक विभागाने आधार मेळावा आयोजित करण्याचे ठरविले आहे. सदरील मेळाव्यामध्ये नवीन आधार कार्ड विनामुल्य काढून मिळणार आहे. तसेच फोटो, मोबाईल क्रमांक, पत्ता व १० वर्षे जूने आधार कार्ड आदी शासकीय दरात अद्यावत करुन मिळणार आहेत. असे आवाहन अधीक्षक डाकघर जळगाव यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment