Public Works Department Office : निविदेवरून ठेकेदारानी सार्वजनिक बांधकाम विभागात काढलीत हत्यारे !

Public Works Department Office : जळगांव : येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील सार्वजनिक बांधकाम विभागात सकाळी  12 ते 12.30 वाजेच्या सुमारास निविदेवरून दोन ठेकेदारात झालेला शाब्दीक वाद वाढत गेला. त्याचे रूपांतर थेट हत्यारे काढण्यापर्यंत गेले. यावेळी बघ्यांची गर्दी वाढत असल्याचे पाहत दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांनी आवारासावर करून तेथून पोबारा केला. याबाबत पोलीसांनी घटनास्थळी येत तपास केला असता कोणीची तक्रार देणारे किंवा याबाबत माहिती देणारे पुढे आले नाही. मात्र असा प्रकार झाल्याच्या घटनेस बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी दुजोरा दिला आहे.

निविदेवरुन झाला राडा

याबात माहिती घेतली असता एका निविदेवरून या दोन ठेकेदारांमध्ये वाद झाला. शब्दाला शब्द वाढत गेल्याने दोन्ही गटाच्या ठेकेदारांच्या संतापाचा पारा वाढत गेला आणि वाहनात असलेली हत्यारे बाहेर काढण्यात आली. हत्यारे बाहेर काढली जात असल्याचे बांधकाम विभागाच्या कार्यालयात आलेल्याना समजताच मोठा गोंधळ उडाला आणि पांगापाग होण्यासह गर्दी होऊ लागली.

दोन्ही गटांनी केला पोबारा

बांधकाम विभागाच्या कार्यालयात व परिसरात सुरू असलेल्या या गोंधळामुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले. तर काहीजण काय घडतेय हे उत्सुकतेने पाहण्यासाठी परिसरात येवू लागले. त्यामुळे या दोन्ही गटांनी आवरते घेत तात्काळ तेथून पोबारा केला.

तीन ठाण्यांचे पोलीस दाखल

याबाबतची माहिती पोलीसांपर्यंत पोहचताच सार्वजनिक बांधकाम कार्यालयात एमआयडी, एल.सी.बी., जिल्हा पेठ अशा तीन  पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी तात्काळ दाखल झाले. पोलीस येईपर्यंत गोंधळ घालणाऱ्या दोन्ही गटांनी पोबारा केला होता. मात्र पोलीसांनी कार्यालयासह परिसरात चौकशी करून माहिती घेतली. परंतु कोणीही याबाबत तक्रार दिलेली नाही.

घटनेचे अनेक साक्ष्ािदार पण एकही तक्रार नाही

पोलीस कर्मचाऱ्यांनी कार्यालयासह परिसरात सखोल चौकशी केली. परंतु अनेकांनी आम्ही घटना पाहीली नाही केवळ आवाज एैकू आला. आमच्याशी काहीच सबंध नसल्याचे पोलीसांना सांगीतले.

सीसीटीव्हीचा अभाव

बांधकाम विभागाच्या कार्यालयात सीसीटिव्ही लावण्यात आलेले नाही.  त्यामुळे घटना घडूनही त्याबाबत ठोस पुरावे मिळणे शक्य नाही.दोन्ही गटांनी हत्यारे काढल्याने याबाबत अधिकारी, कर्मचारी व कार्यालयात येणारे नागरीक यांच्यात दहशत निर्माण झाली आहे.

 

घटना घडल्याचे ऐकिवात : कार्यकारी अभियंता

याबाबत बांधकाम विभागाचे कार्याकारी अभिंयंता नवनाथ सोनवणे यांच्याशी संपर्क साधला असता असा काही तरी गोंधळ झाल्याचे ऐकिवात असल्याचा दुजोरा दिला.

गुप्तांचे गृहमंत्र्यांना ईमेल

दरम्यान या घटनेबाबत माहिती अधिकारी कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांनी मुख्यमंत्री, गृहमंत्री, पोलीस महासंचालक, पोलीस अधिक्ष्ाक, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी बांधकाम विभाग यांच्याकडे ईमेलने पाठवली असून कार्यालयात व परिसरात सीसीटिव्ही लावण्याची मागणी केली आहे.