jalgaon : नविन वर्षापासून महापालिकेच्या मालमत्ता करांवर असणार क्युआर कोड

jalgaon : जळगाव मनपामार्फत मालमत्ता कर भरण्यासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. मागील 3 वर्षांचा ऑनलाईन कर भरणा आढावा घेतला असता, मालमत्ता करधारकांचा ऑनलाईन करभरणा दर वर्षी वाढत आहे.

2021-22 या वर्षी 12110 मालमत्ताधारकांनी एकूण 11 कोटी 60 लाख रुपये ऑनलाईन भरणा केले.

2022-23 या वर्षी तब्बल 13300 नागरिकांनी 17 कोटी 50 लाख रुपये ऑनलाईन भरलेत.

2023-24 मध्ये आजपर्यंत 10400 मालमत्ता धारकांनी 10 कोटी 70 लाख ऑनलाईन जमा झाले आहेत.

अजून आर्थिक वर्ष संपण्यासाठी 3.5 महिने बाकी असून या वर्षी 15000 मालमत्ताधारक आणि एकूण 20 कोटी पर्यंत ऑनलाईन कर भरणा होण्याचा अंदाज आहे.

हे आहे संकेतस्थळ
www.jalgaonmnc.org या वेबसाईट वर जाऊन नागरिक मालमत्ताकराचा ऑनलाईन भरणा करू शकतात. तसेच मनपा मार्फत मालमत्ता धारकांना किती रक्कम अभयशास्ती योजनेत माफ होऊ शकतात याची माहितीदेखील मोबाईलवर एसएमएस पाठविण्यात येत आहे.

ऑनलाईन कर भरण्याकडे नागरिकांचा वाढता कल पाहता पुढील वर्षापासून मालमत्ता करांवर क्युआर कोड देण्यात येणार आहे. त्यामुळे कर दात्यांना मोबाईलवरून क्युआर कोड स्कॅन करून कराचा भरणा काही सेंकंदात करता येणार आहे. यामुळे त्याना महापालिकेत किंवा प्रभाग कार्यालयात जाण्याची गरज भासणार नाही. तसेच महापालिकेत व प्रभाग कार्यालयात होणारी गर्दीही कमी होईल.
गणेश चाटे सहआयुक्त, महसूल, मनपा जळगाव