---Advertisement---

खुशखबर! जळगावकरांना लवकरच मिळणार ८६ हजार नवीन घरकुल

---Advertisement---

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. नुकत्याच झालेल्या बैठकीत जिल्ह्यासाठी ९०,१८८ घरकुलांचे उद्दिष्ट ठरवण्यात आले आहेत. त्यामुळे आता जिल्ह्यातील सर्वसामान्यांचे घरकुलाचे स्वप्न साकार होणार आहे.

आतापर्यंत ८६,००० घरकुले मंजूर करण्यात आली असून, त्यापैकी ७१,००० लाभार्थ्यांना पहिला हप्ता वितरित करण्यात आल्याची माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच बैठक पार पडली. या वेळी जिल्ह्यातील ग्रामीण आणि शहरी घरकुल योजनांचा अंमलबजावणीचा सखोल आढावा घेण्यात आला.

शहरी घरकुल योजना जवळपास ९९% पूर्ण झाली असून, ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणावर प्रगती होत आहे, अशी माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी यावेळी दिली.

हेही वाचा : निर्दयीपणे मारहाण अन् अंगावर मारल्या उड्या; तृतीयपंथीयांकडून तरुणाची हत्या, व्हिडिओ व्हायरल

पहिला हप्ता मिळालेल्या लाभार्थ्यांनी त्वरित घरकुल बांधकाम सुरू करावे, यासाठी गुरुवार, दि. २७ मार्चपासून विशेष अभियान हाती घेतली जाणार आहे. या मोहिमेत प्रशासन आणि लोकसहभागाच्या माध्यमातून अधिकाधिक घरकुले सुरू करण्यावर भर दिला जाणार आहे. राज्य पुरस्कृत रमाई आणि शबरी आवास योजनांना मंजुरी देण्यात आली असून, मंजूर घरकुलेही या अभियानात सुरू करण्याचे निर्देश पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले आहेत.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment