---Advertisement---
जळगाव शहरातील नवनाथ नगर परिसरात एका २७ वर्षीय तरुणाने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. कौस्तुभ सतीश पोतदार (वय २७, रा. नवनाथ नगर) असे मृत तरुणाचे नाव असून ही घटना ७ फेब्रुवारी रोजी घडली. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कौस्तुभ पोतदार हा नाशिक येथे एमआर म्हणून काम करत होता. तो जळगावातील नवनाथ नगर येथे काकांच्या घरी आला होता. ७ फेब्रुवारी रोजी काका व घरातील इतर सदस्य बाहेर गेले असताना त्याने घरात गळफास घेत जीवन संपविले.
काही वेळाने हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्याला तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेनंतर परिसरात अतिशय हळहळ व्यक्त केली जात आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोहेकॉ गुलाब माळी करत आहेत. कौस्तुभ च्या आईचे यापूर्वीच निधन झाले असून त्याचे वडील पिंप्राळा परिसरात राहतात. दरम्यान, आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. ८ फेब्रुवारी रोजी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.









