जळगाव : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात (एसटी महामंडळ) मोठी भरती निघाली असून, इच्छुक आणि पात्र उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे. एसटी महामंडळाच्या विभागीय कार्यालयात अप्रेंटिस पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. महामंडळाने अधिकृतरीत्या ही जाहिरात प्रसिद्ध केली असून, एकूण २६३ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
ही भरती विविध तांत्रिक पदांसाठी असून, इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख ३ मार्च २०२५ आहे.
रिक्त पदांचा तपशील:
- मेकॅनिक मोटार व्हेईकल – 55 पदे
- मोटार व्हेईकल बॉडी बिल्डर – 60 पदे
- मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल – 30 पदे
- वेल्डर – 20 पदे
- पेंटर – 06 पदे
- डीझेल मेकॅनिक – 70 पदे
- रेफ्रिजरेटर अँण्ड एअर कंडीशनर – 10 पदे
- इलेक्ट्रोनिक्स – 10 पदे
- अभियांत्रिकी पदवीधर – 02 पदे
पात्रता व शैक्षणिक अर्हता
- उमेदवारांचे वय १६ ते ३३ वर्षांच्या दरम्यान असावे.
- संबंधित पदासाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून (ITI) संबंधित ट्रेडमध्ये उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
- ऑटोमोबाईल किंवा मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा / पदवीधर उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.
- भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
अर्ज करण्याची प्रक्रिया
१. उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट www.mhrdnts.gov.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करावा.
२. अर्ज ३ मार्च २०२५ पर्यंत स्वीकारले जातील.
३. उमेदवारांनी अर्जाची प्रत महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, विभागीय कार्यालय, जळगाव येथे पाठवावी.