‘जळगाव तरुण भारत’च्या ‘रायटर्स ग्रुप’चा आज शुुभारंभ

तरुण भारत लाईव्ह । १७ जानेवारी २०२२ । ‘जळगाव तरुण भारत’ आणि जळगाव जिल्ह्यातील साहित्यिक व कलाकार यांच्या एकत्रित माध्यमातून साहित्य सेवा घडावी, यासाठी आपण ‘जळगाव तरुण भारत रायटर्स ग्रुप’ सुरू करीत आहोत. शुभारंभाचा हा कार्यक्रम मंगळवार, दि. १७ जानेवारी रोजी सायंकाळी ५.३० वाजता छत्रपती संभाजी नाट्य संकुलात होणार आहे.

या कार्यक्रमात ‘निळ्या-काळ्या रेषा’ या गाजलेल्या आत्मचरित्राचे लेखक व चित्रकार श्री. राजू बाविस्कर यांचा साहित्यिक जगताच्या वतीने सत्कार करण्यात येणार आहे. आपण स्वत: साहित्यिक आणि रसिक-वाचक आहात. एका चांगल्या कलाकृतीचा सन्मान करण्यासाठी आणि रायटर्स ग्रुपच्या शुभारंभासाठी आपण निमंत्रित आहात. कृपया उपस्थित राहावे, ही विनंती.

चंद्रशेखर जोशी,
निवासी संपादक,
‘जळगाव तरुण भारत’, जळगाव 

रवींद्र मोराणकर
निमंत्रक,
‘जळगाव तरुण भारत’, जळगाव