---Advertisement---

Jalgaon News : तापमानाच्या पाऱ्यात पुन्हा चढउतार, जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर

---Advertisement---

जळगाव : गेल्या आठवड्यात जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेसोबतच ढगाळ वातावरणाचा इशारा देण्यात आला होता. दोन दिवसांपूर्वी तापमान ४२ ते ४३ अंशावर तर वातावरणातील आर्द्रता कमी झाल्याने हवामान कोरडे असल्याने उष्णतेत वाढ झाली होती. मात्र यानंतर निर्माण झालेली ढगाळ वातावरणाची स्थिती बऱ्याच प्रमाणात निवळली आहे.

गेल्या चार दिवसांपासून पहाटेच्या वेळी निर्माण झालेला गारवाही कमी होत असल्याचे दिसून आले आहे. आगामी सप्ताहाच्या सुरुवातीलाच ३९ ते ४० अंशांच्या दरम्यान असलेल्या तापमानात वाढ होऊन पारा कमाल ४२ ते ४३ तर किमान २४ ते २७अंशावर राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

हेही वाचा : १ एप्रिलपासून देशात लागू होणार नवे नियम, घरातील प्रत्येकाच्या खिशावर होणार परिणाम!

मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात भुसावळसह विभागातील सर्वच तालुक्यांमध्ये तापमानात वाढ होताना दिसून येत आहे. पुढील काही दिवसांत तापमानात आणखी वाढ होणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. रविवार, ३० मार्च रोजी गुढीपाडव्यापासून पुढील दोन ते तीन दिवस तापमान ४२ ते ४३ अंशांवर पोहचू शकेल, असा अंदाज हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तवला आहे.

सध्या दिवसाचे कमाल तापमान ३७ ते ३९ अंश तर किमान तापमान हे १९ ते २१ डिग्री दरम्यान जाणवत आहे. आगामी काळात मुख्यतः निरभ्र आकाश राहून कमाल तापम ३९ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक राहू शकेल. तापमान वाढीसह शुष्क हवामानामुळे रब्बी हंगामातील गहू, हरभरा, मका, ज्वारी, बाजरीसह कांदा पिके काढणीला वेग येणार आहे.

दरम्यान, आगामी सप्ताहात मंगळवार-शुक्रवार दरम्यान ढगाळ वातावरणामुळे तापमानात काही प्रमाणात घट होणार असली तरी दमटपणामुळे उकाड्यात मात्र वाढ होणार असल्याचे दिसून येत आहे.

प्रशासन अलर्ट मोडवर

जिल्हाभरात मार्चअखेरीस तसेच आगामी काळात उष्णतेची लाट येण्याचे संकेत हवामान विभागाकडून वर्तविण्यात आले आहेत. त्यानुसार जिल्हा व आरोग्य प्रशासन सतर्क असून यासंदर्भात बैठक घेऊन तातडीच्या उपाययोजनांची अंमलबजावणी केली जात आहे. सामान्य रुग्णालयासह तालुका ग्रामीण रुग्णालयात उष्माघात कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. तर जळगाव शहर महानगरपालिकेअंतर्गत स्थानिक स्तरावरील रुग्णालयातदेखील अत्यावश्यक सेवांतर्गत उष्माघात कक्ष स्थापन करण्यात आला असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी म्हटले आहे.

बेमोसमी पावसाची शक्यता कमीच

२४ मार्चपासूनच ढगाळ वातावरण आहे. मात्र बेमोसमी पावसाची शक्यता खूप कमी आहे. त्यामुळे रब्बी पीक काढणी दरम्यान पावसामुळे नुकसानीचा धोका टळला आहे. गेल्या तीन ते चार दिवसात एकाएकी झालेल्या दिवसाच्या कमाल तापमान वाढीसह उष्णतेमुळे कांदा, गहू यासारख्या रब्बी पिकांवर विपरीत परिणाम जाणवला. परंतु काहीअंशी ढगाळ वातावरणामुळे २-३ डिग्रीने कमाल तापमान घसरले होते. कमाल व किमान तापमानामुळे पिकांना काहीसा दिलासा मि ळाला असून आगामी काळात बेमोसमी पावसाची शक्यता कमीच असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment