---Advertisement---

सूर्य आग ओकतोय ! जळगावचे तापमान ‘चाळीशी’वर, उन्हाच्या तडाख्याने जीवाची लाही लाही

by team
---Advertisement---

जळगाव- शहरासह राज्यात मार्च महिन्यात उन्हाचा तडाखा वाढला आहे. राज्यात कमाल तापमानाचा पारा चाळीशीपार गेला आहे. शनिवारी (ता. १५) चंद्रपूर येथे राज्याच्या उच्चांकी ४१.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर जळगाव शहरासह जिल्ह्यात कालच्या तापमानाने ३९.५ अंशांचा टप्पा गाठला आहे. जळगावचे तापमान आता चाळिशीपर्यंत गेले आहे.

उन्हापासून संरक्षण मिळावे, यासाठी बाजारात टोप्या, रुपाल, स्कार्फ ठिकठिकाणी विक्रीस आले आहेत. तापमान ३९.५ अंश सेल्सिअस असल्याने जिल्हावासीयांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. शहरांमध्ये एरवी गर्दी असणाऱ्या रेल्वेस्थानक, बस स्थानक, खासगी प्रवासी वाहनांच्या ठिकाणी सुद्धा नागरिकांचा शुकशुकाट पाहायला मिळत आहे.

तापमान वाढल्यामुळे शहरांमध्ये कामानिमित्त फिरणाऱ्या नागरिकांच्या जीवाची या उन्हामुळे लाहीलाही होत आहे. त्यामुळे दुपारच्या सुमारास बाहेर फिरणाऱ्या सर्व नागरिकांनी रुमाल, त्याचबरोबर महिलांनी स्कार्फचा वापर केल्याचे पाहायला मिळत आहे.

मार्चच्या सुरुवातीपासूनच जळगाव शहराच्या तापमानात वाढ झाली आहे. नागरिकांना उष्णतेचा सामना करावा लागत आहे. नागरिकांनी आवश्यक असेल तरच घराबाहेर पडावे. घराबाहेर पडताना टोपी, छत्री, रुमाल, स्कार्फचा वापर करावा. सतत पाणी प्यावे. अश्या सूचनाही देण्यात आल्या आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment