---Advertisement---

Jalgaon traffic police : ॲक्शन मोडवर : दुचाकीस्वाराकडून सुमारे 71 हजाराचा दंड वसूल

---Advertisement---

Jalgaon traffic police : शहरातील वाहतुकीला व वाहनधारकांना शिस्त लावण्यासाठी शहर वाहतूक पोलीस आता ॲक्शन मोडवर आले आहेत. आज दिवसभरात विविध ठिकाणी दुचाकीस्वारांवर कारवाई करून सुमारे 71 हजार रूपयांचा दंड वसूल केला आहे.
महामार्गावर विना हेल्मेट
महामार्गावर विना हेल्मेट दुचाकी चालवणाऱ्यां 87 जणांवर कारवाई करून 43 हजार रूपयांचा दंड करण्यात आला. तो लवकरच वसूल करण्यात येणार आहे.

ट्रिपल शिट

दुचाकीवर ट्रिपल शिट जाणाऱ्या 7 जणांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून 7 हजाराचा दंड वसूल करण्यात आला आहे.

फॅन्सी नंबर प्लेट
दुचाकीच्या पुढे व मागील भागावर निर्धारीत नंबर प्लेट न लावता फॅन्सी नंबर प्लेट  लावणाऱ्या 7 दुचाकीस्वारांवर कारवाई करून त्यांच्याकडून 35 हजार रूपयांचा दंड वसूल करण्यात आला.

बेशिस्त पार्किग
नेहरू चौक ते टॉवर चौकात रस्त्यावर बेशिस्त पार्किग करणाऱ्या 36 दुचाकीस्वारांवर कारवाई करून त्यांच्याकडून 22 हजार रूपयांचा दंड वसूल करण्यात आला.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment