---Advertisement---

वादळ वारं सुटलं… जळगावात झाडे कोसळली, घरांचे पत्रेही उडाले

---Advertisement---

जळगाव : जळगाव शहरात आज मंगळवारी दुपारी वादळीवाऱ्यासह हलक्या पावसाने हजेरी लावली. मात्र पाऊस बंद झाला असला तरी वारा जोरदार सुटला असून, शहरातील अनेक भागात झाडे उन्मळली, तर काही ठिकाणी घरावरील छतही उडाले आहेत. तसेच विजेते खांबही पडल्याने काही भागात वीज पुरवठा खंडित झाला आहे. दरम्यान, हवामान विभागाकडून आणखी दोन दिवस अवकाळी पावसाचा इशारा (unseasonal rain alert) देण्यात आला आहे.

हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, आगामी दोन दिवस जळगाव, (Jalgaon weather update) नंदुरबार, धुळे, नाशिक, अहिल्यानगर, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यांसह तुफान पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान खात्याकडून १३ जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे. तर कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

यंदा मार्च, एप्रिल हे दोन महिने नागरिकांना प्रचंड उष्णतेचे गेले. मागच्या काही दिवपासून तापमानाचा पारा वाढला असून वाढत्या उष्णतेमुळे नागिरक हैराण झाले होते. दरम्यान शुक्रवार ४३.९ अंशावर असलेले जळगावचे तापमान घसरून शनिवारी ४२.८ अंशावर आले. त्यानंतर आगामी काही दिवस जिल्ह्यात अवकाळी पावसाचा इशारा (unseasonal rain alert) हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.

या जिल्ह्यांना येलो अलर्ट

जळगाव, नंदुरबार, धुळे, नाशिक, अहिल्यानगर, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये आजपासून आगामी काही दिवस जिल्ह्यात अवकाळी पावसाचा अंदाज आहे.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment