तरुण भारत लाईव्ह न्युज जळगाव – जिल्ह्यात रविवार १८ डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. याची मतमोजणी प्रत्येक तालुकास्तरावर मंगळवार २० रोजी सकाळी १० वाजेपासून करण्यात आली. बहुतांश ग्रामपंचायतींचे निकाल ११.३० पर्यंत हाती आले. जिल्ह्यात बहुतांश ग्रामपंचायतींवर भाजपा शिंदे गटाने वर्चस्व मिळवले असून १० ते १२ टक्के ग्रा.पं.त महाविकास आघाडी गटाला निसटता विजय मिळविला आला असल्याचे दिसून आले.
जळगाव तालुक्यात १२ ग्रामपंचायतीपैकी २ ग्रामपंचायती बिनविरोध असून १० ग्रामपंचायतीची मतमोजणी जळगाव शहरातील नूतन मराठा महाविद्यालयात ग्रामपंचायत निवडणूक मतमोजणी करण्यात आली. याप्रसंगी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत उभे असलेल्या उमेदवारांसह त्यांच्या समर्थकांनी निकाल ऐकण्यासाठी महाविद्यालयाच्या बाहेर एकच गर्दी केली होती. ज्या ग्रामपंचायतीचा निकाल लागल्यानंतर संबंधित व गावातील ग्रामस्थांनी एकाच जल्लोष केला होता.१२.३० वाजेदरम्यान पार पडली. यात जळगाव तालुक्यात १२ ग्रा.पं.पैकी ६ ग्रामपंचायतीवर महिला सरपंच म्हणून निवडून आल्या असून दोन ग्रा.पं.अंतर्गत महिलांची बिनविरोध निवड झाली आहे.
जळगाव तालुक्यात १२ ग्रामपंचायत निहाय विजयी सरपंच निवडणूक निकाल पुढीलप्रमाणे
किनोद सरपंच- संदीप मच्छिंद्र चौधरी, ग्रा.पं.तीत ९१६ मतदानापैकी ५१० मते, कुवारखेडा -सतीश रघुनाथ पाटील ३८१ पैकी २२६ मते, वराड बुद्रुक- अनिता बाई नितीन जाधव ६८३ पैकी ३८२ मते, देऊळवाडे-निकिता मोतीलाल सोनवणे ५४८ पैकी ३२१ मते, वसंतवाडी- विनोद शिवाजी पाटील १२६४ पैकी ४३७ मते, विदगाव- कैलास सोनू जळके (अनुसूचित जाती)१५६३ पैकी ५९८ मते, जळके- चंद्रकांत गणपत पाटील (ना.मा.प्र.) ७७३ पैकी ६६८ मते, भोलाणे- नितीन सुरेश कोळी १०९३ पैकी ५२२ मते, भादली खुर्द- दिपाली किशोर पाटील ९९४ पैकी ५०५ मते, घार्डी -आमोदा- कल्पना लीलाधर पाटील १०३४ पैकी ४३१ मते मिळवून प्रतिस्पध्यार्ंवर विजय मिळविला.
तर जळगाव तालुक्यात बिनविरोधदोन ग्रामपंचायतीत सावखेडा खुर्द येथे सरपंच पदी ज्योती जितेंद्र पाटील आणि सुजदे येथे सरपंच पदी सुनंदा सुनील सोनवणे यांची बिनविरोध बिनविरोध निवड झालेली असल्याचे जळगाव तालुका निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार नामदेव पाटील यांनी जाहीर केले.