---Advertisement---

दुर्दैवी! लग्नसोहळा आटोपून घराकडे निघाले, पण वाटेतच काळाचा घाला

---Advertisement---

जळगाव : वऱ्हाडीच्या वाहनाला झालेल्या भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना जामनेर-पहूर मार्गावर सोनाळा फाट्याजवळ शनिवारी (१० मे) रोजी घडली. दशरथ रतन चव्हाण असे मृताचे नाव असून या घटनेत अन्य नऊ वऱ्हाडी जखमी झाले आहेत.

जामनेरच्या रामपूर तांडा लहासर येथे लग्न असल्याने छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील फर्दापूर येथील रहिवाशी असलेले लग्नाचे वऱ्हाड शनिवारी (१० मे) आलेले होते. लग्न आटपून वऱ्हाड मंडळी क्रुझर वाहनाने फर्दापूर गावाकडे निघाले. मात्र जामनेर-पहूर मार्गावर सोनाळा फाट्याजवळ आयशर कंटेनरने क्रूझरला धडक दिली.

या अपघातात नवरदेवाचे काका दशरथ चव्हाण यांचा जागीच मृत्यू झाला. तर लखिचद शंकर चव्हाण (वय ५०), मोहनदास शंकर जाधव (वय ५०), विक्रम मोतीलाल चव्हाण (वय २५), बाबू पांचु जाधव (वय ७५), उखा दलू राठोड (वय ६५), धिरलाल सदू राठोड (वय ६५), हिरा महारु चव्हाण (वय ५८), प्रतीक प्रवीण राठोड (वय ७), भिवसिग मनुर चव्हाण (वय ७५) सर्व रा. फर्दापूर ता.सोयगाव जि. छत्रपती संभाजी नगर हे जखमी झाले.

घटनेची माहिती मिळताच वहऱ्हाडातीलच अन्य वाहनांमधील नातेवाइकांनी जखमींना पहूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी कंटेनरसह चालकास ताब्यात घेतले असून, या प्रकरणी पहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

दुर्दैवी! परीक्षा देऊन परतताना काळाचा घाला, वडिलांचा जागीच मृत्यू ; मुलगी जखमी

जळगाव : स्वीफ्ट कारमधून जळगाव येत असताना भरधाव बोलेरोने धडक दिली. या भीषण अपघातात कारमधील महेश सुरेश सोनार (वय ४५ रा. रामेश्वर कॉलनी) यांचा मृत्यू तर त्यांची मुलगी नयना सोनार हिच्यासह दोघे जण गंभीर जखमी झाले.

अमळनेर येथे नयना हिची परीक्षा होती. परीक्षा दिल्यानंतर पिता-पुत्रीसह अन्य शनिवारी (१० मे) जळगाव येत होते. पिंप्री (ता. धरणगाव) येथे या कारला भरधाव बोलेरोने धडक दिली. महेश सोनार हे कुटुंबासह रामेश्वर कॉलनीत वास्तव्यास होते. त्यांची मोठी मुलगी नयना हिचा एमबीए सिईटीचा अमळनेर येथे पेपर होता. त्यासाठी महेश सोनार, मुलगी नयना आणि राजेश धूत (रा. दौलतनगर) असे कारने अमळनेर येथे गेले. नयना हिने पेपर दिला. त्यानंतर तिघे जण दुपारी जळगाव येथे परतीच्या प्रवासाला मार्गस्थ झाले. पिंप्री गावाजवळून ही कार जात असताना भरधाव बोलेरोने स्वीफ्ट कारला धडक दिली. यात महेशसह त्यांची मुलगी नयना तसेच राजेश धूत जखमी झाले. दुपारी दीड वाजेच्या सुमारास ही घटना घडली. प्रत्यक्षदर्शीनी घटनास्थळी धाव घेत तिघांना तत्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविले. तपासणीअंती डॉक्टरांनी महेश सोनार यांनी मृत घोकित केले. ही वार्ता कळाल्यानंतर कुटुंबियासह नातेवाईकांनी जबर धक्का बसला. दोघा जखमींवर उपचार सुरू आहेत.

त्यांच्या अनेक स्नेहीजणांनी रुग्णालयात धाव घेतल्याने मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. महेश सोनार हे संत नरहरी बहुउद्देशीय संस्थेचे सदस्य तसेच श्री एक्वॉ वॉटरचे ते संचालक होते. त्यांच्या अकस्मात मृत्यूने रामेश्वर कॉलनीसह म `हरुणमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी धरणगाव पोलिसात घटनेची नोंद करण्याचे काम सुरू होते.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment