जळगाव : जिल्ह्यात खुनाचे सत्र सुरूच आहे. आणखी एका तरुणाचा खून करण्यात आल्याची घटना जळगाव शहरात घडलीय. शहरातील गोलाणी मार्केटमध्ये रविवारी रात्री १० वाजेच्या सुमारास एका ३० वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने भोसकून हत्या करण्यात आली आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
सोपान गोविंदा हटकर (३०, रा. हरिविठठल नगर) असे मयत तरुणाचे नाव आहे. मात्र, खून होण्यापूर्वी गोलाणी मार्केटच्या तळमजल्यावर काही तरुणांमध्ये वाद झाला होता, त्यातून हा खून झाला असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
जळगाव जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून खुनाचे सत्र सुरूच आहे. जामनेर, यावल तालुक्यातील खून प्रकरण नंतर रविवारी रात्री पुन्हा एक खून झाला आहे. रात्री १०.१५ च्या सुमारास शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या गोलाणी मार्केटच्या तळमजल्यावर सोपान गोविंदा हटकर या तरुणाचा धारदार शस्त्राने भोसकून खून करण्यात आली
मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसून आल्यानंतर आजू बाजूच्या लोकांनी सदर घटनेची माहिती पोलिसांना दिली. दरम्यान अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी,उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत, एलसीबीचे निरीक्षक किसन नजनपाटील, शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड हे घटनास्थळी पोहचले त्यानंतर पोलिसांनी मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलवीला.तसेच नेमकी काय घटना घडली याचा तपास पोलिसांकडून रात्री उशिरापर्यंत सुरू होता तर संशयितांच्या शोधार्थ पथक सुध्दा रवाना झाले आहे.