जामा मशिदीनंतर आता अलीगडमधील मशीद चर्चेत; पंडित केशव देव यांचा ऐतिहासिक मंदिर असल्याचा दावा

#image_title

लखनऊ : संभलमधील जामा मशिदीनंतर आता अलीगडमध्ये असलेली मशिदी वाद समोर आला आहे. ऐतिहासिक जामा मशीद ही मंदिर असल्याचा दावा आहे. आरटीआय कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे की, ऐतिहासिक उपरकोट हे जामा मशीद नसून ते एक मंदिर असल्याचा दावा केला जात आहे. आरटीआयच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे की, पूर्वी मशिदीच्या ठिकाणी शिवमंदिर होते. सोमवारी त्यांनी दिवाणी न्यायाधीश न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली असून त्यांची याचिका मान्य करण्यात आली होती. याप्रकरणाची पुढील सुनावणी १५ फेब्रुवारी २०२५ रोजी जाहीर करण्यात येणार आहे.

आरटीआयचे कार्यकर्ते आणि पंडित केशव देव गौतम हे भ्रष्टाचाराविरोधी सेना पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. त्यांनी मशिदीच्या उत्पत्तीबद्दलची माहिती मिळवण्यासाठी वेगवेगळ्या विभागांकडे अनेक आरटीआय याचिका दाखल करण्यात आल्या आहेत.

दरम्यान पंडित केशव देव यांनी जामा मशीद कोणाच्या जमिनीवर बांधण्यात आली. ती कधी बांधण्यात आली आणि मशिदीवर मालकी हक्क कोणाचा आहे. अशी माहिती आरटीआयद्वारे महापालिकेला विचारण्यात आली होती. संबंधित मशीद ही अवैध जमिनीवर बांधण्यात आली असून तिच्या बांधकामाबाबत कोणतीही नोंद उपलब्ध नसल्याचे उत्तर महापालिकेने दिले. ही इमारत कोणत्याही व्यक्तीच्या मालिकीची नसल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे.

या तथ्यांच्या आधारे पंडित केशव देव यांनी दिवाणी न्यायाधीश न्यायालयात याचिका दाखल केली. संबंधित याचिकेमध्ये त्यांनी मशीद खाली करण्यास सांगतली असून शिवमंदिराचा जीर्णोद्घार करण्याची मागणी करण्यात आली होती. न्यायालयाने ही याचिका स्वीकारली असून सुनावणीची तारीख १५ फेब्रुवारी २०२५ असल्याची माहिती समोर आली आहे.

उत्तर प्रदेश राज्यात अशी अनेक प्रकरणं असून यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. संभलमधील जामा मशीद ही हरिहरेश्वर मंदिराच्या अवशेषांवर बांधण्यात आली असल्याचा अनेकदा हिंदूंकडून दावा करण्यातल आला आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार, सर्वेक्षणही करण्यात आले असून बदाऊन आणि बागपतमध्येही प्राचीन मशिदींच्या जागी मंदिरे असल्याचा दावा करण्यात आला होता.

अशातच आता सर्वोच्च न्यायालयाने नुकतेच कनिष्ठ न्यायालयांना स्पष्टपणे परवानगिशिवाय मंदिर-मशीद वादात कोणतेही एक सर्वेक्षणाचे आदेश देऊ नयेत, असे सांगितले आहे.