Jamun: जांभूळ खाताय मग ‘या’ गोष्टींचे करा काटेकोर पालन, अन्यथा…

by team

---Advertisement---

 

Jamun: निळ्या-काळ्या रंगाचे असलेले हे फळ केवळ चवीनेच नाही तर आरोग्याच्या दृष्टीनेही एक खजिना आहे. यात अँटिऑक्सिडंट्स, फ्लेव्होनॉइड्स, व्हिटॅमिन सी, झिंक, कॅल्शियम, फायबर, मॅग्नेशियम आणि आयर्नचे गुणधर्म आढळतात, ज्यामुळे शरीराला अनेक आजारांपासून दूर ठेवता येते. पावसाळ्यात जेव्हा पोटाच्या समस्या वाढतात, तेव्हा जांभूळ खाणे पोट निरोगी ठेवण्यापासून ते रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यापर्यंत फायदेशीर ठरते. जांभूळ  हे मधुमेहावर रामबाण औषध मानले जाते. पण जांभूळ खाण्याचे काही नियम आहेत, जर काळजी घेतली नाही तर ते फायद्याऐवजी नुकसान करू शकते.

दूध : जांभूळ खाल्ल्यानंतर दुध तसेच दुग्धजन्य पदार्थांचेसेवन केल्याने पोटदुखी, अपचन, गॅस, अॅसिडिटी यासारख्या समस्या उद्भवू शकतात. जांभूळ खाल्ल्यानंतर लगेच दूध पिणे टाळावे. तुम्ही जांभूळ खाल्ल्यानंतर एक ते दोन तासांनी ते पिऊ शकता.

लोणचे : लोणचे आणि जांभूळ दोन्ही आंबट असतात. ते एकत्र खाल्ल्याने आम्लपित्त आणि छातीत जळजळ वाढू शकते. हळद त्यावर प्रतिक्रिया देखील देऊ शकते.

हळद: जांभूळ आणि हळद एकत्र सेवन केल्याने या दोन्ही गोष्टींची प्रतिक्रिया होऊन पोटाचा त्रास होऊ शकतो.

पाणी: जांभूळ खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिऊ नका, त्यामुळे पचन समस्या आणि अतिसार किंवा गॅसची समस्या उद्भवू शकते.

गोड पदार्थ: जांभूळ खाल्ल्यानंतर लगेच गोड पदार्थ खाल्ल्याने पोट जड होऊ शकते आणि पोट फुगू शकते.

जांभूळ खाण्याची योग्य पद्धत

रिकाम्या पोटी जांभूळ खाऊ नका, अन्यथा पोटात आम्लपित्त होऊ शकते.

दुपारी किंवा संध्याकाळी ते खाणे अधिक फायदेशीर आहे.

जांभूळ खाल्ल्यानंतर किमान ३० मी . नंतर पाणी प्या.

जांभूळ खाण्याचे फायदे

जांभूळ उच्च रक्तदाबाच्या समस्येपासून आराम देते.
जांभूळ हृदयाच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत.
जांभूळ शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढवते.
जांभूळ हे मधुमेहासाठी प्रभावी फळ मानले जाते.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---