जळगाव : आरक्षण बचाव संघर्ष समितीतर्फे जळगावात ७ ऑक्टोबर रोजी महामोर्चा काढण्यात येणार आहे.सुप्रीम कोर्टाने दिलेल्या एससी, एसटी उपवर्गीकरण व क्रिमिलेयरच्या अन्यायकारक निर्णयाच्या विरोधात जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर हा महामोर्चा काढण्याचे निश्चित करण्यात आलेले आहे. याबाबत आरक्षण बचाव संघर्ष समितीची सभा घेण्यात आली. सभेत समितीचे अध्यक्ष मुकुंद सपकाळे यांनी सुप्रीम कोर्टाच्या या निकाला विरोधात व्यापक जन आंदोलन हाती घ्यावे लागेल,असे सांगितले.
कॉम्रेड शरद पाटील यांचे हे जन्मशताब्दी वर्ष आहे. त्यानिमित्ताने सोमवार,१६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी पाच वाजता काव्यरत्नावली चौकात आयु. सुनील शिंदे (पाचोरा) यांचे जातिअंताची लढाई या विषयावर जाहीर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.
सुप्रीम कोर्टाच्या या निकालाच्या विरोधात जळगाव जिल्ह्यातील तालुक्यांवर व्यापक जन आंदोलनाचे टप्पे ठरवण्यात आलेले आहेत.बुधवार, १८ सप्टेंबर रोजी जामनेर, बोदवड, मुक्ताईनगर तसेच शुक्रवार २० सप्टेंबर रोजी एरंडोल, पारोळा, अमळनेर रविवार २२ सप्टेंबर रोजी यावल, रावेर, भुसावळ मंगळवार,२४ सप्टेंबर रोजी पाचोरा, भडगाव, चाळीसगाव आणि २६ सप्टेंबर ,गुरुवार रोजी धरणगाव, चोपडा आणि जळगाव या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या व्यापक सभा घेऊन सुप्रीम कोर्टाच्या निकाला विरोधात 7 ऑक्टोबर रोजी महामोर्चा काढण्यात येणार आहे त्या मोर्चामध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्याचे तालुकास्तरावर मीटिंग माध्यमातून जनजागृती करण्यात येणार आहे.
आरक्षण बचाव संघर्ष समितीच्या सभेला सभेचे अध्यक्ष मुकुंद सपकाळे, जयसिंग वाघ, प्रा.डॉ. सत्यजित साळवे यांनी मार्गदर्शन केले. कैलास तायडे यांनी सभेचे सूत्रसंचालन व आभार मानले. सभेला दिलीप अहिरे, , प्रकाश दाभाडे, प्रीतीलाल पवार, गोपाळ भालेराव, दिलीप सपकाळे, भारत सोनवणे, समाधान सोनवणे, अनिल बावस्कर, संजय बागुल, सोमा भालेराव आणि श्रीकांत बाविस्कर व एससी एसटी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.