जान्हवी कपूर ही बोनी कपूर आणि श्रीदेवी यांची मुलगी आहे आणि आता ती एक यशस्वी अभिनेत्री बनली आहे. अभिनेत्री जान्हवी कपूर फक्त तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाही तर, खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असते.
जान्हवीने एका चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान, तिच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित एक किस्सा सांगितला, जो खूपच आश्चर्यकारक होता. जान्हवी ‘मिस्टर अँड मिसेस माही’ या चित्रपटाचे प्रमोशन करत असताना, तिने हा किस्सा सांगितला होता.
जान्हवी कपूर तिच्या खासगी आयुष्यातील एक मजेशीर किस्सा सांगताना म्हणाली, ‘जेव्हा आम्ही जुन्या घरात राहात होतो. तेव्हाची गोष्ट आहे. मी माझ्या एका मित्राला घरी बोलावलं होतं. तेव्हा घरी कोणीच नव्हतं. आम्ही दोघं बेडरुममधून बसून गप्पा मारत होतो. आणि अचानक पप्पा तेव्हा घरी आले. त्यावेळेला काय करायचं मला काहीच कळलं नाही. अशात मी त्याला दरवाजातून नाही तर खिडकीतून जाण्यास सांगितलं.’
हेही वाचा : जि.प. कर्मचाऱ्याची राहत्या घरात आत्महत्या, तीन जण ताब्यात
‘मला असं वाटलं पप्पांना काही माहिती होणार नाही. पण सीसीटीव्हीमध्ये त्यांनी सर्वकाही पाहिलं होतं. तेव्हा त्यांनी मला शिक्षा दिली होती आणि घरातील सर्व खिडक्यांना ग्रील लावल्या…’ असं जान्हवीने एका मुलाखतीत सांगितलं होतं.
नंतर तिने स्पष्ट केले की ती आणि तिचा मित्र केवळ एका सिनेमावर चर्चा करत होते, मात्र वडिलांना पाहून त्यांचा घाबरलेला चेहरा अधिक मजेदार झाला होत.
या किस्स्याला शेवट करताना जान्हवीने विनोदाने म्हटले की, तिच्या वडिलांनी यानंतरही तिला अनेकदा या गोष्टीची आठवण करून दिली, जेणेकरून ती पुढे काही काळजीपूर्वक वागेल. जान्हवीच्या या खुलाशामुळे चाहत्यांमध्ये हशा पसरला आणि त्यांनीही तिच्या कुटुंबातील या गमतीशीर गोष्टीचे कौतुक केले.