---Advertisement---

Four Day Work Week : जपानची गोष्टचं न्यारी, जन्मदर वाढविण्यासाठी घेतला ‘हा’ निर्णय

---Advertisement---

गेल्या काही वर्षांत अनेक देशांमध्ये, विशेषतः विकसित आणि विकसित होणाऱ्या देशांमध्ये, जन्मदरात घट होत असल्याचे आढळून आले आहे. जपानमध्ये सुद्धा ही समस्या जाणवत आहे. त्यामुळे जपानमधील जन्मदर वाढीची समस्या सोडवण्यासाठी एक नवीन उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

काय आहे उपक्रम ?

टोकियोचे गव्हर्नर युरिको कोइके यांनी पुढील वर्षापासून कार्यालयात चार दिवस कामाचे नियम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. अर्थात पुढील वर्षी एप्रिलपासून कर्मचाऱ्यांना आठवड्यातून तीन दिवस सुट्टी घेण्याचा पर्याय असेल.

आठवड्यातून चार दिवसांच्या कामाच्या नियमामुळे लोकांना त्यांच्या वैयक्तिक आणि कौटुंबिक जीवनाला अधिक वेळ देता येईल, ज्याचा सकारात्मक परिणाम कुटुंब विस्तारावर होऊ शकतो.

टोकियोचे गव्हर्नर युरिको कोइके यांनी हा निर्णय घेतल्यामुळे कामाच्या दबावात राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना शारीरिक व मानसिक आरोग्यासाठीही चांगला लाभ मिळेल. तीन दिवसांच्या सुट्टीमुळे लोक त्यांच्या छंद, कुटुंब, आणि विश्रांतीसाठी अधिक वेळ देऊ शकतील.

जपानसारख्या देशासाठी, जिथे कमी जन्मदर आणि वृद्धत्वाची समस्या गंभीर आहे, अशा प्रकारचे धोरण लोकांना कुटुंब विस्तारासाठी प्रोत्साहन देऊ शकते. हा उपक्रम कितपत यशस्वी होतो ते पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

काय आहेत  कारणं ? 

शिक्षणाचा प्रसार : स्त्रियांचं शिक्षण वाढल्यामुळे आणि त्यांनी नोकऱ्यांमध्ये सक्रिय सहभाग घेतल्यामुळे कुटुंब नियोजनाबाबत जागरूकता वाढली आहे.

शहरीकरण : शहरांमध्ये राहण्याच्या पद्धती आणि खर्चामुळे लोक लहान कुटुंबांच्या दिशेने झुकत आहेत.

कुटुंब नियोजन : गर्भनिरोधकांचा वाढता वापर आणि कुटुंब नियोजन कार्यक्रम यामुळे लोक जास्त मुलांना जन्म देण्याचे टाळत आहेत.

आर्थिक दबाव : जीवनमान सुधारण्याच्या प्रयत्नात लोक मोठ्या कुटुंबाचा भार उचलण्यास टाळाटाळ करत आहेत.

सांस्कृतिक बदल : पूर्वीच्या काळातील “मोठं कुटुंब म्हणजेच सामर्थ्य” ही मानसिकता आता बदलत चालली आहे.

परिणाम 

कमी लोकसंख्या वृद्धी दराचा अर्थ म्हणजे आर्थिक आणि सामाजिक प्रणालींवर कमी ताण, पण भविष्यात वृद्ध लोकसंख्येचं प्रमाण वाढल्याने कार्यक्षम कामगार वर्ग कमी होण्याचा धोका आहे. आरोग्य आणि निवृत्ती व्यवस्थापनासंबंधित आव्हानं वाढण्याची शक्यता आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment