वॉशिंग्टन डी.सी : रिपब्लिकन पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनात अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची राष्ट्राध्यक्ष पदाचा उमेदवार म्हणून निवड करण्यात आली आहे. रिपब्लिकन पक्षाचा हा निर्णय ट्रम्प यांच्या हत्येच्या प्रयत्नानंतर आला आहे. यासह, ओहायोचे सिनेटर जेडी वेंस यांची रिपब्लिकन पक्षाने उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून निवड केली आहे.
रिपब्लिकन पक्षाचे हे अधिवेशन अमेरिकेतील पेनसिल्व्हेनिया राज्यातील मिलवॉकी शहरात होत आहे. रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी संपूर्ण अमेरिकेतून आले आहेत. हे अधिवेशन सोमवार, दि. १५ जुलै २०२४ सुरू झाले आणि १८ जुलैपर्यंत चालेल. यामध्ये २०२४ च्या अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीची पुढील रणनीतीही बनवली जाईल.
या अधिवेशनात डोनाल्ड ट्रम्प देखील सहभागी झाले आहेत. सोमवारी कानावर पट्टी बांधून ते आले आहेत. पेनसिल्व्हेनियामध्ये त्याच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्यानंतर त्यांनी प्रथमच सार्वजनिक कार्यक्रमात हजेरी लावली. या हल्ल्यानंतर ट्रम्प यांची प्रतिमा नायकासारखी झाली आहे.
या अधिवेशनांमध्ये ट्रम्प यांची राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून निवड झाल्याबरोबरच अमेरिकेच्या ओहायो राज्यातील ३९ वर्षीय सिनेटर जेडी वेंस यांची उपाध्यक्षपदी निवड केली. ट्रम्प यांनी स्वत: जेडी वेंस यांची निवड जाहीर केली. त्यांनी लिहिले, “इतरांच्या प्रचंड प्रतिभेचा दीर्घकाळ विचार केल्यानंतर आणि काळजीपूर्वक विचार केल्यावर, मी ठरवले आहे की युनायटेड स्टेट्सचे उपाध्यक्षपद स्वीकारण्यासाठी सर्वोत्तम उमेदवार हे ओहायो राज्याचे सिनेटर जेडी वेंस आहेत.”
जेडी वेंस हे ओहायो राज्यातील पहिल्या टर्मचे सिनेटर आहेत. वेंस यांनी यूएस मरीन कॉर्प्समध्ये सेवा दिली आहे. त्यांनी इराक युद्धात काम केले आहे. येथे ते युद्ध पत्रकार आणि पीआरओ होते. त्यांनी अमेरिकेतील येल विद्यापीठातून कायद्याचे शिक्षण घेतले. पुस्तक लिहून ते प्रसिद्ध झाले. हे पुस्तक डोनाल्ड ट्रम्पबद्दल होते. त्यांच्याकडे काहीवर्षांपूर्वी ट्रॅम्पचे आलोचक म्हणून पाहिले जात होते. यानंतर ते ट्रम्प यांचे समर्थक बनले आणि २०२२ मध्ये रिपब्लिकन पक्षाकडून निवडणूक लढवत सिनेटरही बनले.
जेडी वेंस यांचे भारताशी खास नाते आहे. त्यांच्या पत्नीचे नाव उषा वेंस उर्फ उषा चिल्लुकुरी आहे. उषा वेंस या भारतवंशीय आहेत. येल विद्यापीठात शिकत असताना उषा आणि जेडी वेंस यांची भेट झाली. यानंतर दोघेही प्रेमात पडले आणि २०१४ मध्ये लग्न केले. दोघांनीही हिंदू विधी पार पाडले होते. उषा वेंस या स्वत: एक यशस्वी वकील आहेत.
वेंस यांच्या यशात उषाचा मोठा वाटा आहे. जेडी वेंस हे त्यांच्या स्पष्ट मतांसाठीही ओळखले जातात. अमेरिकेच्या रणनीतीत वेंस यांना भारताचे समर्थक मानले जाते. त्यांनी अलीकडेच अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांच्यावर भारत आणि जपानला झेनोफोबिक देश संबोधल्याबद्दल टीका केली होती. ते म्हणाले होते की हे दोन्ही देश चीनच्या विरोधात अमेरिकेचे भागीदार आहेत