---Advertisement---

जिनिंगला आग : 35 लाखांचे नुकसान; शेंदूर्णीतील घटना

by team

---Advertisement---

 जामनेर : नर्मदा कॉटन इंडस्ट्रीज जिनिंगला ७ रोजी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. यात सुमारे 35 लाखांची कपाशीची रुई जळून खाक झाली. या प्रकरणी पहूर पोलिसात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली.

शेंदुर्णी येथील गट नंबर५२० / २ / २ कृष्णा उद्योग/ नर्मदा कॉटन इंडस्ट्रिज जिनिंगच्या गोडावूनला ७ रोजी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास अचानक इलेक्ट्रीक शॉर्ट सर्कीट झाल्यामुळे आग लागली. यात दोन्ही गोडावूनमध्ये असलेली अंदाजे 190 क्विंटल वजनाची कपाशीची रुई जळाल्याने अंदाजे ३० ते ३५ लाख रुपयांचे नुकसान झाले.

या प्रकरणी दीपक रामचंद्र अग्रवाल यांच्या खबरीवरून अकस्मात आगीची नोंद करण्यात आली. पुढील तपास हवालदार प्रशांत विरनारे करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---