नवी दिल्ली : मणिपूरच्या जीरीबाम येथे अज्ञात हल्लेखोरांनी सीआरपीएफ आणि राज्य पोलीस दलाच्या संयुक्त पथकावर हल्ला केला. घात करून हा हल्ला करण्यात आला असून यात सीआरपीएफचा एक जवान हुतात्मा झाला आहे, तर तीन पोलीस जखमी झाले. रविवार, दि. १४ जुलै रोजी सकाळी ९:४० वाजता हा हल्ला झाल्याचे सांगण्यात आले.
सीआरपीएफचे पथक आणि जीरीबाम जिल्हा पोलिसांचे पथक संयुक्तपणे ऑपरेशन राबवत होती. याचदरम्यान, हल्लेखोरांनी अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात सीआरपीएफमधील पॅराकमांडो हुतात्मा झाला, तर तीन पोलीस जखमी झाले. अजय कुमार झा (४३) असे जवानाचे नाव असून ते बिहारमधील रहिवासी होते.